ताज्या घडामोडी

पोलादपूर येथे काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

प्रतिनिधी निळकंठ साने

Download Aadvaith Global APP

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात आरक्षण विषयावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केले. हे वक्तव्य आरक्षण विरोधी असल्याचा आरोप करीत राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेनेने ठिकठिकाणी निषेध आंदोलन छेडले असून याच धरतीवर पोलादपूर तालुक्यामध्ये शिवसेनेतर्फे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी देत तीव्र निषेध करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत दोनदा पराभव करणारी काँग्रेसच होती आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा काँग्रेस सरकारच्या काळात मिळाला नसून तो पी व्ही सिंग यांच्या सरकारचा कार्यकाळात मिळाला असल्याचे वक्तव्य यावेळेस आंदोलन कर्त्यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये