ताज्या घडामोडी

सांस्कृतिक परंपरा जपत सामाजिक बांधिलकी जपणारा श्री गणेश मित्र मंडळ देवळे गाव सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

पोलादपूर प्रतिनिधी

Download Aadvaith Global APP

तालुक्यात अत्यंत दुर्गम भागात असणार देवळगाव हे जसं कृषी पंढरी म्हणून ओळखलं जायचं तसंच सांस्कृतिक कार्यक्रम व परंपरा जपणारे गाव म्हणजे देवळगाव एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून देवळे गावातील श्री गणेश मित्र मंडळाने सन 1994 साली गणेशोत्सवाची सुरुवात केली गावातील युवा तरुण मंडळी मुंबई स्थित असणारे सर्व नोकरदार वर्ग खास गणपतीसाठी गावी एकत्र येऊन एकोप्याने एकजुटीने गेली 30 वर्षे गणेशोत्सव साजरा करत आहेत यंदाचे 31वे वर्षे  नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवून मंडळाने गणेशोत्सव साजरा केला.

 

पर्यावरणाशी समतोल राखून दरवर्षी गणपतीचे देखावा केला गेला. गावात यावेळी सर्व तरुण एकत्र सर्व महिला व युवा मुली एकत्र येऊन गौरीचे पारंपारिक नृत्य असे फुगडी व इतर ग्रामीण भागात प्रसिद्ध असणारे खेळ साजरे केले  गावातील विद्यार्थ्यांसाठी  व महिलांसाठी विविध स्पर्धा जशी चित्रकला निबंध स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा दरवर्षी मंडळाकडून घेण्यात आली  महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ विद्यार्थी गुणगौरव सोहळा  मंडळाकडून घेतला गेला 51 हुन अधिक तरुणांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले ऋण व्यक्त केले आमदार भरतशेठ गोगावले, महाड। माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, राजीप सदस्य चंद्रकांत कळंबे, माजी सभापती शैलेश सलागरे,तहसीलदार कपिल घोरपडे, सरपंच सुनीता मेस्त्री,सुरेश सकपाळ (सुजय प्रतिष्टान पुणे) किशोर जाधव,,निलेश आहिरे,लक्ष्मण मोरे,अनिल दळवी, उपसरपंच किसन रिंगे इत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्या

एरवी गावामध्ये शंभर दीडशे लोक असतात मात्र गणपती मध्ये प्रत्येक घरातला मुंबईकर व शहरातील नागरिक आपल्या गावात येतो त्यामुळे गाव गजबजून जातो आणि एक सांस्कृतिक सोहळा दरवर्षी साजरा होतो गावाची एकजूट हीच गावची ताकद आहे मुंबईत तुटपुंजा पगारात काम करत असताना सुद्धा गणेशोत्सव आपला आहे या भावनेतून प्रत्येक ग्रामस्थ , मंडळाचे सदस्य जमेल तसं आपलं योगदान देत असतात  यावेळी मंडळाचा 31 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

गणेशोत्सव काळात भजन इत्यादी कार्यक्रमाची रेलचेल होती यावर्षी महिलांनी आपल्या सुमधुर गायनांनी सर्व गणेशभक्तांची मने जिंकली.. गणेश  विसर्जन पारंपारिक वाद्यसह ढोल ताशा सह लेझीम पथक व डीजेच्या तालावर सर्व गावकरी सावित्री नदीच्या किनारी आनंद उत्सव साजरा करतानाचा हा देखावा म्हणजे एक अविस्मरणीय सोहळाच असतो अगदी प्रत्येक गावकरी या सोहळ्याने भारावून जातो याच आठवणी ठेवून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या उक्ती प्रमाणे पुढच्या वर्षाची वाट पाहतअसतो  हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळाच्या सर्व  कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये