ताज्या घडामोडी
श्री वरदायनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडे येथे शैक्षणिक साहित्य वाटप
पोलादपूर निळकंठ साने
रायगड शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचलित श्री वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडे येथे गुरूवार ०५ सप्टेंबर २०२४ रोजी धैर्य सामाजिक संस्था यांच्या मार्फत इयत्ता दहावीच्या विदयार्थ्यांसाठी ऑनलाइन टेस्ट सिरीज शिष्यवृत्तीचे कीट वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमला धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे काँर्डिनेटर वेद साने,एक्सेल इंडस्ट्रीचे विवेक शेंडे, श्री पाटणकर, शिक्षणप्रेमी नारायण साने ,पत्रकार निलकंठ साने, तात्याबा साने, मोहन साने, ऍड. रमेश साने, सुजल दळवी, विदयालयाचे मुख्याध्यापक लवटे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच चांढवे व देवळे स्कूलमध्ये देखील किटचे वाटप करण्यात आले.