भांडुप रेल्वे स्थानकात जलद गाडयांना थांबा द्या : भांडुपकरांची मागणी
भांडुपकर बसले साखळी उपोषणाला
भांडुपकर बसले साखळी उपोषणाला
प्रतिनिधी भांडुप, मुंबई
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघातर्फे शुक्रवार २३ ऑगस्ट २०२४ रोजी भांडुप मधील प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय साखळी उपोषण खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजोल संजय पाटील, आरपीआर(आरके) अध्यक्ष राजाराम खरात, स्टेशन मॅनेजर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत यांना राजोल पाटील यांना लिंबुपाणी देऊन उपोषणाची सांगता केली.यावेळी महासंघा तर्फे भांडुप रेल्वे स्थानकात जलद गाडयांना थांबा द्या या प्रमुख मागणीसह भांडुप रेल्वे टर्मिनस करा, भांडूप-दिवा-सावंतवाडी नवीन गाडी सुरू करा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रकाश मोहिते, सुनिल करपे, प्रमोद कासारे, रेणुका साळुखे, अरुणा गोफणे, आशा पडवळ, मोरेश्वर आगवणे, दिपक चव्हाण, मधुकर जोईल, वर्षा निगडे, साधना चौधरी, प्रमोद खांबे, सरला गायकर, ऍड. सुनिल अवसरमल, प्रसाल लाड, सुरेंद्र तावडे, संजय राणे, गणेश पवार, नितिन आवाडे, रेल्वे पोलीस, आरपीएफ पोलीस, पत्रकार व रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.