ताज्या घडामोडी

सानेगाव आश्रम शाळेत जागतिक आदिवासी व क्रांतिकारी दिन साजरा

विद्यार्थ्यांनी केला आदिवासी पेहराव

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

प्रतिनिधी रुपेश रटाटे

Download Aadvaith Global APP

रोहा : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव, तालुका-रोहा, जिल्हा-रायगड. येथे आज जागतिक आदिवासी दिन आणि क्रांतिदिन असा संयुक्तिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री.फसाळे सर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.राजाराम सिताराम वाघमारे हे लाभले. तसेच शालेय स्कुल कमिटीचे सदस्य मा.श्री. मोतीराम लेंडी हे उपस्थित होते. सानेगाव-यशवंतखार या ग्रुपग्रामपंचयातीचे माजी सदस्य श्री तुषार ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पूजनाने झाली.आदिवासी नेते व क्रांतिकारक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ईशस्तवन,स्वागतगीत, विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यामध्ये प्रामुख्याने नाचगाणे, नाटक, बक्षीस वितरण समारंभ झाला.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय भाषणात आजच्या आदिवासी दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. शेवटी आभारप्रदर्शन झाले. आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे आभार मानले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.दिलीप.मा.सकपाळ सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.योगेश धुमाळ सर यांनी केले.तसेच आभारप्रदर्शन श्री मिथुन जोगळेकर सर यांनी केले.

सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक तसेच माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, वर्ग चार कर्मचारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये