ताज्या घडामोडी

मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत पत्रकार पुन्हा एकदा मैदानात;१५ ऑगस्ट पूर्वी न झाल्यास १७ ऑगस्ट पासून रायगड प्रेस क्लबचा आंदोलनाचा इशारा

१५ ऑगस्ट पूर्वी न झाल्यास १७ ऑगस्ट पासून रायगड प्रेस क्लबचा आंदोलनाचा इशारा

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

सतरा वर्षे रखडलेल्या मुंबई
मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्ती १५ ऑगस्ट पूर्वी न झाल्यास १७ ऑगस्ट पासून
रायगड प्रेस क्लबचा आंदोलनाचा इशारा

Download Aadvaith Global APP

महाडः (मिलिंद माने) तब्बल १७ वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची तब्बल १८व्या वर्षी देखील दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाल्याने व पडलेल्या खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी म्हणून पेवर ब्लॉकने खड्डे भरण्याची नामी शक्कल उद्या राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या संकल्पनेतून राबवली असून गणपती पूर्वी या महामार्गाची पूर्णपणे दुरावस्था होणार असल्याने १५ऑगस्ट पूर्वी या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास १७ ऑगस्ट पासून आंदोलन करण्याचा इशारा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी सरकारला दिला आहे

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झाली असून. तब्बल १७ वर्षे झाल्यानंतर देखील या महामार्गाचे काम अद्यापि पूर्ण झालेली नाही त्यातच. नागोठणे ते लोणेरे पर्यंत रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे वाहन चालकांना समजत नसल्याने दररोज या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात घडल्याचे व वाहने रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत हा रस्ता १५ ऑगस्टपर्यंत सुस्थितीत केला नाही, तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, १७ ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी खड्डे असतील, त्या ठिकाणी रायगड प्रेस लबच्या वतीने सरकारचे श्राध्द घालून आंदोलन करणार असल्याचे निवेदन रायगड प्रेस लबच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणला दिले असल्याचे रायगड प्रेस लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये सांगितले.

देशातील काही रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करून गिनिज बुक सारख्या विक्रमांची नोंद करणार्‍या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने देशातील सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग म्हणून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी देखील तेवढीच तत्परता दाखवावी, अशी मागणी रायगड प्रेस लबने या निवेदनातून केली आहे.

. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या महामार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केला जात आहे. तो दावा अर्धसत्य असून, रायगड जिल्हा हद्दीमध्ये अनेक भागात या महामार्गाचे काम अद्यापही जागोजागी रखडले आहे. महामार्गाचा जो भाग तयार झाला आहे, तो देखील नित्कृष्ट दर्जाचा असून तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्याला जागोजागी मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत तयार मार्ग समतल नसल्यामुळे वाहनातून प्रवास करताना जम्पिंग जपाक चा अनुभव पाहण्यास मिळत आहे

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या वडखळ ते इंदापूर दरम्यान . त्यातही नागोठणे ते लोणेरे दरम्यान, रस्त्यावर प्रचंड खड्डे आणि खड्यांमुळे चिखलाचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. याच टप्प्यांतील आठ उड्डाण पुलांचे काम देखील अद्यापी अपूर्णावस्थेत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगांव शहरात अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी माणगांव शहराबाहेरून काढण्यात येणाऱ्या बायपास मार्ग देखील अर्धवट अवस्थेत पडला आहे. त्यामुळे माणगांव येथे होणार्‍या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. या महामार्गाचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. महाड नजिक रस्त्यालगत असलेली संरक्षक भिंत खचण्याचा प्रकार गतवर्षी घडला होता. यावर्षी खांब येथील उड्डाण पुलाची संरक्षक भिंत कोसळली. ठिकठिकाणी काँक्रीट रस्त्याला भेगा पडल्या आहेत. या कामात कोणत्याही प्रकारचा दर्जा आणि गुणवत्ता राखली गेलेली नाही हे याचे उत्तम उदाहरण असल्याचे जागोजागी पाहण्यास मिळत आहे.

. दरवर्षी गणपती सण आला की हा महामार्ग खड्ड्यात जातो त्यामुळे या महामार्गावर जनतेची आंदोलने झाल्याची पाहण्यास मिळत आहेत जनतेची व पत्रकारांची आंदोलन झाल्यानंतर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, खासदारांनी पाहणी दौर्‍यांचा फार्स करुन थातूरमातूर उपाययोजना करायची हा पायंडा मागील सतरा वर्षात कायम राहिला आहे . रायगड प्रेस क्लब त्याच प्रमाणे जिल्ह्यातील विविध संघटनांनी वारंवार आंदोलने करुन देखील या रस्त्याची दुर्गती काही संपण्यास तयार नाही. त्यामुळेच येत्या १७ ऑगस्ट रोजी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी खड्डे पडलेत त्या ठिकाणी महामार्गावर सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन छेडण्याचा निर्णय रायगड प्रेस क्लबने घेतला आहे. १५ ऑगस्ट २०२४ पूर्वी जर हा महामार्ग सुस्थितीत झाला नाही, तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ऑगस्ट २०२४ रोजी हे आंदोलन होईल आणि त्याची सर्व जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिाकरण विभागावर आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांवर तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांवर राहिल, असा इशारा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, सचिव अनिल मोरे यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
या निवेदनाची प्रत केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रायगडचे पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनाही पाठविण्यात आले असल्याचे रायगड प्रेस लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये