ताज्या घडामोडी

महिलांवरील अत्याचार थांबावेत यासाठी बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

महिलांवरील अत्याचार, बलात्कार, विनयभंग आदी प्रकार घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची पत्रातून मागणी.

Download Aadvaith Global APP

उरण दि. ३०(विठ्ठल ममताबादे )
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील परिसरात कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी देऊन, महिलांच्यावर होणाऱ्या बलात्कार, खून, अत्याचार याबाबत तात्काळ सुरक्षा, वेगवान न्याय, सी.सी. टिव्ही व अन्य आधुनिक सुरक्षा यंत्रणा पोलीस दलास देऊन उरणच्या यशश्री शिंदे आणि नवी मुंबईच्या अक्षता म्हात्रे आंगास्कर, श्रद्धा भोईर यांना न्याय देण्याबाबत विनंती बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे सल्लागार तथा सामाजिक कार्यकर्ते राजाराम पाटील,अध्यक्ष विश्वनाथ पाटील, सचिव रविंद्र चव्हाण यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहारद्वारे केली आहे. जर न्याय न मिळाल्यास मातृसत्ताक महिला आंदोलनास शासनाने सामोरे जाण्यास तयार राहावे असा आक्रमक इशारा बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेतर्फे प्रशासनाला देण्यात आले आहे.

नवी मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्यात घडलेल्या महिला हत्याकांड हे नवी मुंबईच्या मातृसत्ताक स्त्री सत्ताक संस्कृतीवरचा हल्ला आहे.आपल्या देशात स्त्री शुद्रातीशुद्र अर्थात स्त्रीयां आणि ओबीसी एस.सी., एस.टी. यांच्यावर अत्याचारांनी परंपरा मनुस्मृती सांगत आलीय याचा परिचय शासनाची महसूल, पोलीस प्रशासन, सिडको, नैना, जेएनपीटी, ओएनजीसी, सेझ, अलिबाग कॅरिडॉर भूसंपादन, नवी मुंबई विमानतळ प्रकल्प या सर्वच शासकीय सेवांतुन इथल्या नागरिकांना अनुभवास येत आहे.आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज विकसीत मुंबई, नवी मुंबई ठाणे- रायगड पालघर येथे रेल्वे विमानतळे, मेट्रो यांच्या जाळयातुन सारा भारत आणि जगभरातुन नागरिक येथे येत आहेत. परंतु इतल्या भूमिपुत्र आणि भूमिकऱ्यांवर त्यांचे विपरीत परिणाम होत आहेत.उरण हे शहर घारापुरी, मुंबई येथील ऐतिहासिक लेण्यामुळे अडीच हजार वर्षापासून जागतिक व्यापारी केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर आहे. येथे बौद्ध, लेणी, पिरवाडी दर्गा (मुस्लीम संस्कृती) ईस्ट इंडियन, शुद्धता माता चर्च, उरण येथे, जैन, सिंधी, गुजराती, मारवाडी, व्यापारी आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ओबीसी दर्यावर्दी आरमारी लोक हजारो वर्षे गुण्यागोविंदाने राहतात. त्याच्यासोबत एस.सी., एस.टी., मागासवर्गीय आदिवासीही राहतात हे सारे मातृसत्ताक महिलाकेंद्री जीवन जगतात.उरणच्या यशश्री शिंदे या मुलींवर ज्या पद्धतीने क्रोर्याची परिसिमा करणारे अत्याचार गुन्हेगारांनी केलेत त्यामुळे इथल्या महिला वर्गामध्ये प्रचंड दहशत भितीचे वातावरण आहे. शासनाबद्दलचा, भारतीय संविधाना बद्दलचा आदर, विश्वास धोक्यात आला आहे. याचबरोबर नवी मुंबईच्या अक्षता म्हात्रे हिच्यावर गणेश मंदिरात, देवासमक्ष ब्राह्मण पुजाऱ्यांनी केलेल्या बलात्कारामुळे आता विश्वास कोणत्या देवळावर प्रार्थना मंदिरावर, पुजाऱ्यांवर आणि धर्मावर ठेवावा ? असा प्रश्न आहे, यातुन कोणालाही धर्म सुटत नाही साहेब, उरते फक्त भारतीय संविधान.महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिण योजना आणली, महिलांना प्रथमच लाडकी असल्याचा अनुभव शासनाकडून येतोय, येवढ्यात कधीही न पाहिलेले अत्याचार इथल्या महिलेच्या वाट्याला आले इथला आगरी, कोळी, कराडी, भंडारी, मुस्लीम मच्छीमार पंधरा पंधरा दिवस समुद्रावर मासेमारी करित असताना आपल्या शिलाचे, परिवाराचे, मुलांचे संरक्षण करण्यास समर्थ असणाऱ्या आगरी कोळी महिलांना उरण रेल्वे स्टेशन, नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ हे विकासाचे मार्ग बलात्कारी, खुनी, अत्याचारी उरणमध्ये घेऊन येणारे संकट ठरु नये.उरण पोलीस स्टेशनमध्ये स्त्रिया, आदिवासी, बौध्द, मातंग, चर्मकार (एस.सी./ एस.टी.) ओबीसी, अल्पसंख्यांक यांच्या तक्रारीची दखल घेण्यात पोलीस कमी पडले नसते तर अनेक घटना टाळता आल्या असत्या, यशश्री शिंदे ही तरुणी त्याचा बळी आहे.केवळ पोलीस स्टेशन नाही तर महसूल तहसील, जेएनपीटी, ओएनजीसी सागरी पोलीस, सिडको येथील अधिकारी वर्गात केवळ पैसा कमविण्याचे केंद्र म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोळीवाडे गावठाण आहेत. असा त्यांचा हेतु नाही ना ? त्यासाठी ते येथे बदल्या करून घेत नाही ना ? याचा शोध शासकीय तपास यंत्रणांनी घ्यावा. येथे आलेल्या सर्वच अधिकाऱ्यांनी किती पैसे कमविले, लोकांची किती फसवणूक केली ? याचाही शोध शासनाच्या ईडी वगैरे विभागांनी घ्यावा.रस्त्यावर सी.सी. टिव्ही लावणे गरजेचे आहे. त्यापेक्षा पोलीस स्टेशन, तहसिल महसूल या सिडको इथल्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हे सी. सी. टीव्ही लावून मा. प्रधानमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी थेट पाहणे गरजेचे आहे.रात्री उशिरा कामावरुन येणाऱ्या रेल्वे, मेट्रो, विमानतळे येथून प्रवास करणाऱ्या स्त्रिया, ओबीसी, एस.सी., एस.टी., अल्पसंख्यांक नागरिकांच्या मनातुन या यशश्री शिंदेच्या वरील अत्याचारमुळे प्रचंड संताप आहे तो संवेदनशीलता, करुणा आणि संविधानिक शिस्तीने, सामाजिक न्यायाने आपण समजून घेऊन. त्वरीत कार्यवाही करावी. भारतीय नागरिकांच्या मनात शासनाबद्दल विश्वास निर्माण करावा अशी मागणी बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे सल्लागार तथा सामाजिक कार्यकर्ते राजाराम पाटील, अध्यक्ष विश्वनाथ पाटील, सचिव रविंद्र चव्हाण यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसेच महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये