आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

देवा ग्रुप फाउंडेशन तर्फे पोलादपूर तालुक्यातील प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा
देवा ग्रुप फाउंडेशन तर्फे पोलादपूर तालुक्यातील प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप
पोलादपूर प्रतिनिधी
      सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात अग्रेसर असणाऱ्या देवा ग्रुप फाऊंडेशन या संघटनेच्या पोलादपूर शाखेकडून न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे व रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चरई येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप मंगळवार 23 जुलै 2024 रोजी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला देवा ग्रुप फॉउंडेशन पोलादपूर तालुका अध्यक्ष अनिकेत मेस्त्री, उपाध्यक्ष कल्पेश मोरे, कार्याध्यक्ष किरण पार्टे, सचिव विनीत शिंदे, प्रदीप मेस्त्री, गणेश सुतार, चरई शाळेचे मुख्याध्यापक शाम लवंगारे, उपशिक्षिका संगीता पांचाळ, संदेश उकार्डे, नारायण कुंडले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवारांचे स्वागत चरई शाळेकडून करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक शाम लवंगारे यांनी शाळेला केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटपाबद्दल  आभार व्यक्त केले तसेच संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

Download Aadvaith Global APP
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये