आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाड शहरात घरावर कोसळले झाड!

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

प्रतिनिधी चंद्रहास नगरकर

Download Aadvaith Global APP

महाड शहरातील एका घरावर मोठे झाड कोसळल्याची घटना बुधवार 24 जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. बुधवारी सकाळीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह शहरामध्ये पाऊस सुरू असल्याने शहरातील तांबडभुवन भागातील संजय कमळाकर गुरव यांच्या घरावर सकाळी सव्वा दहाच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेले हे मोठे झाड कोसळले आहे. यावेळी घरामध्ये त्यांची पत्नी व मुलगी होते. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. हे झाड कोसळल्याने या परिसरातील मार्ग देखील बंद झाला होता.घटनेची माहिती मिळताच नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन दलामार्फत तातडीने झाड हटवण्यास सुरुवात करण्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये