आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

पीआरएसआय`च्या अध्यक्षपदी `इंडियन ऑईल`च्या अनिता श्रीवास्तव

उपाध्यक्षपदी `अलाईड ब्लेंडर्स`चे श्री. राजेश परिदा; सचिवपदी महापारेषणचे डॉ. मिलिंद आवताडे यांची निवड

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाची (PRSI) मुंबई कार्यकारिणी जाहीर

Download Aadvaith Global APP

मुंबई प्रतिनिधी पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेच्या मुंबई चॅप्टरची नवीन कार्यकारिणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक यांनी नुकतीच जाहीर केली. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी `इंडियन ऑईल`च्या मुख्य महाव्यवस्थापक (सांघिक सुसंवाद) श्रीमती अनिता श्रीवास्तव यांची उपाध्यक्षपदी अलाईड ब्लेंडर्स ऍंड डिस्टिलरी लि.चे संचालक (जनसंपर्क) श्री. राजेश परिदा तर सचिवपदी महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांची निवड झाली.

नवीन कार्यकारिणीत सहसचिवपदी महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले तर खजिनदारपदी संकेत कम्युनिकेशन्सचे उपाध्यक्ष श्री. अमलन मस्करेन्हास यांची नियुक्ती झाली आहे. याचबरोबर समितीत सदस्य म्हणून इंडियन ऑईलच्या महाव्यवस्थापक (सांघिक सुसंवाद) श्रीमती अंजना अरविंद, हिंदूस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापक (सांघिक सुसंवाद) श्री. सुदिप्तो बसाक, एएसबी कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ब्रज किशोर, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे सांघिक सुसंवाद विभागाचे प्रमुख श्री. संतनु चक्रवर्ती, इंडिया एक्झिम बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक श्री. कुणाल गुलाटी, अव्दैत इंडिया प्रा.लि.चे समूह प्रमुख श्री. जयशंकर यांची निवड झाली आहे.

सल्लागारपदी `पीआयबी`चे माजी महासंचालक श्री. मनीष देसाई, हिंदूस्थान पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक (सांघिक सुसंवाद) श्री. राजीव गोयल, नेहरू विज्ञान केंद्राचे माजी कार्यक्रम समन्वयक श्री. सुहास नाईक-साटम यांची निवड करण्यात आली.

सदस्यत्व समितीमध्ये बृन्हमुंबई महानगरपालिकेचे उपजनसंपर्क अधिकारी श्री. गणेश पुराणिक, ऍडफॅफ्टर पीआरचे श्री. शैलेश कसबे, आदित्य बिर्ला ग्रुपचे सांघिक सुसंवाद विभागाचे प्रमुख श्रीमती जनेत अरोले यांची तर कार्यक्रम समितीमध्ये जनसंपर्क सल्लागार श्री. नौमान कुरेशी, इंडियन ऑईलचे सहाय्यक व्यवस्थापक (सांघिक सुसंवाद) श्री. शिवप्रसाद डी., संसाधन एकत्रीकरण समितीमध्ये `एनएसई`चे मुख्य विपणन व संपर्क अधिकारी श्री. अरिजित सेनगुप्ता, इंडियन ऑईलचे व्यवस्थापक (सांघिक सुसंवाद) श्री. लक्ष्मी नारायण मिश्रा, तर इंडस्ट्री-अकॅडमिक समन्वय समितीमध्ये मुंबई विद्यापीठातील पत्रकारिता विभागाच्या प्रा. दैवता चव्हाण-पाटील, गुरूनानक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. पुष्पिंदर गुप्ता भाटिया यांची निवड करण्यात आली.

जनसंपर्क क्षेत्राचा विकास, जनसंपर्क क्षेत्राबद्दल समाजात जाणीवजागृती, जनसंपर्क मूल्यांची जोपासना, अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान, जनसंपर्क क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, जनसंपर्क क्षेत्रातील चांगल्या कामाचा गौरव, जनसंपर्क क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन, जनसंपर्काशी संबंधित विविध साहित्य प्रकाशित करणे आदी विषयांवर पीआरएसआय ही संस्था भारतात १९६६ पासून कार्यरत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये