आरोग्य व शिक्षण

वैद्यकीय मदत कक्षातर्फे महाड व पोलादपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

पोलादपूर संदिप जाबडे

Download Aadvaith Global APP

वैद्यकीय मदत कक्ष व स्वराज्य मित्र मंडळ या संघटनेतर्फे शनिवार ०६ जुलै २०२४ रोजी महाड व पोलादपूर तालुक्यातील शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांच्या सेवेत अविरत कार्यरत असणाऱ्या, विविध आजारांनी ग्रासलेल्या महाराष्ट्रातील रुग्णांना निस्वार्थीपणे सेवा देणाऱ्या वैद्यकीय मदत कक्षाने पोलादपूर तालुक्यातील प्राथमिक शाळा कापडे बुद्रुक, दिसेधोंड, पार्ले, पैठण तर महाड तालुक्यातील करंजखोल आदिवासीवाडी, मुठवली येथील दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या,कंपास, डब्बा, पाणी बॉटल, पेन्सिल बॉक्स, पेन, कलर पेन आदी शैक्षणिक वस्तूंचे वाटप करीत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.
कार्यक्रमास वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम, ज्येष्ठ समाजसेवक शिवराम उतेकर, वैद्यकीय मदत कक्षाचे नितीन नारकर, माजी सभापती शैलेश सलागरे, मनोहर कदम,लक्ष्मण उफाळे, ज्ञानोबा बांदल, विनोद नांगरे, स्वप्नील पाटील,विजय नांगरे, महेश राजापकर, स्वप्नील देसाई, नामदेव शिंदे, अजित वनगुळे आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक शिवराम उतेकर यांनी पार्ले शाळेस पाच हजार रुपये रोख धनादेश शाळेचे मुख्याध्यापक उतेकर गुरुजी यांच्याकडे सुपूर्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. वैद्यकीय मदत कक्षाचे नितीन नारकर यांनी शहरी भागात आपण विद्यार्थ्यांना लाखो रुपये खर्च करून कॉन्व्हेन्ट शाळेत शिकवतो पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये भरता येत नाही म्हणून शाळा सोडावी लागते. त्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून छोटासा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.

चौकट
मागील नऊ वर्षांपासून के के मित्र मंडळ, वैद्यकीय मदत कक्ष, स्वराज्य मित्र मांडला व संलग्न संघटनेमार्फत पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागात शैक्षणिक साहित्य वाटप करीत असल्याचे सांगितले. मी गरीब कुटुंबात शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे, गरिबीच्या कळा मी सोसलेल्या आहेत. त्या कळा या विद्यार्थ्यांना सोसायला लागू नये त्यामुळे या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने करतो.
संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम
वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये