आरोग्य व शिक्षण

सोपान चांदे यांचा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मान

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

संपादक : संदिप जाबडे

Download Aadvaith Global APP

 

रायगड जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा रानवडी बु।। येथील पदवीधर शिक्षक सोपं रामचंद्र चांदे यांना नुकताच अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले. सोपान चांदे यांच्या सेवेची सुरुवात १९९४ रोजी शिक्षक पेशामध्ये झाली तसेच पदवीधर पदावर २००९ मध्ये त्यांची नियुक्ती झाली .तसेच २०१० मध्ये रायगड जिल्हा शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला .त्यानंतर सोपान चांदे यांनी २००१ मध्ये अखिल पोलादपूर प्राथमिक शिक्षक संघाचे तालुक्याचे अध्यक्षपद भूषविले .त्यानंतर त्यांना २०११ मध्ये अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघाच्या सरचिटणीस पदी त्यांची नेमणूक झाली. तसेच २०१६ मध्ये जिल्हाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली ते सध्या जिल्हा संघाच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.त्यानंतर रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मध्यवर्तीच्या जिल्हा संघाच्या अध्यक्ष पदावर ते विराजमान झाले.त्यांना २०१४ मध्ये महाड- पोलादपूर मतदारसंघातून पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या संचालक पदावर निवडून आले. तसेच २०२२ च्या परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून संपूर्ण पॅनल निवडून आले व पहिला चेअरमन होण्याचा मान त्यांना मिळाला.सहकार क्षेत्रामध्ये उत्तुंग आणि पारदर्शक काम पतपेढीच्या माध्यमातून मानद सचिव म्हणून ते करत आहेत. शिक्षकांच्या प्रश्नासाठी व अडचणी सोडवण्यासाठी सतत २४ तास झटणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

ते सध्या ज्या शाळेवर कार्यरत आहे ती रानवडी बु ।। शाळा तालुक्यातील एक आदर्श शाळा म्हणून सर्वांना परिचित आहे.शाळेला मागील वर्षी ग्रामीण गुणवत्ता आदर्श शाळेचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस प्राप्त झाले असून चालू वर्षी सुद्धा शाळेला परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला असून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत शाळेस तालुक्यातून तृतीय क्रमांकाचे बक्षिस १ लाख रुपये मिळाले आहेत. त्यांच्या कार्याची दखल म्हणून आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार जाहीर झाल्यापासून त्यांच्यावर शिक्षण ,कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये