ताज्या घडामोडी

पोलादपूर येथे कार आणि कंटेनरचा भीषण अपघात ; अपघातात दोन जागीच मृत्युमुखी

सुट्टीनिमित्ताने गावी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाव

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

मुख्य संपादक:  संदिप जाबडे

Download Aadvaith Global APP

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरूच असून आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील आंबेडकर नगर समोर उभ्या असलेल्या कंटेनर क्रमांक NL01 AE3150 ला मुंबई दिशेकडून खेड दिशेकडे जाणाऱ्या MH03 CS 1177 या कारने मागून भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने हा अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कंटेनर च्या मागील भागात अडकली. या कार मध्ये ५ प्रवासी प्रवास करीत होते. या भीषण अपघातात २ जण जागीच मृत्युमुखी तर ०३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास ४५ मिनिटांचा कालावधी लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाणे येथील कर्मचारी, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी,स्थानिक ग्रामस्थ, नरवीर रेसक्यू टीम, श्री काळभैरवनाथ रेसक्यु टीम यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये