राजकीय

मतांसाठी समाजासमाजामध्ये अंतर निर्माण करण्याचे पाप करत आहात : सुनिल तटकरेंनी अनंत गीतेंना फटकारले

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

रायगड : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार जोमात सुरू आहे.  प्रत्येक देशातील व्यवस्था ही भिन्न आहे. मग तुमचा आणि माझा देश एकसंघ ठेवायचा असेल… त्याची एकात्मता टिकवायची असेल तर या देशातील सर्वसामान्य नागरिकांना मतांचा अधिकार दिला पाहिजे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे उपकार तुमच्या – माझ्या देशावर आहेत.  म्हणूनच ७५ वर्षाच्या गौरवशाली इतिहासामध्ये हा भारत देश एकसंघ राहिला… एकात्मता टिकली आणि या देशाचे सार्वभौमत्व अबाधित राहिले, असे मत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

Download Aadvaith Global APP

रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ खेड शहरात महायुतीची जाहीर सभा पार पडली यावेळी तटकरे बोलत होते.  याप्रसंगी माजी मंत्री रामदास कदम, आमदार योगेश कदम  यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

तटकरे म्हणाले, १९५२ पासून हा देश संसदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना या देशातील सुज्ञ जनतेने आपल्या पसंतीची सरकारे निवडली. इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली त्यानंतर देशभर प्रक्षोभ उमटला त्यावेळी देशातील जनतेने जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली चळवळ उभी केली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेवर कॉंग्रेसला ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. पण त्यानंतर लोकप्रियता इतकी घसरली की २०० जागासुद्धा  मिळाल्या नाहीत. विश्वनाथ प्रताप सिंगाचे सरकार या देशात आले त्याला भाजपने पाठिंबा दिला. मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला गेला आणि  देशभरात आगडोंब उसळला त्यांचे सरकार गेले आणि चंद्रशेखर यांचे सरकार आले, पण राजीव गांधी यांनी चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा चार महिन्यात काढला.  १९९६,९८, ९९ या सलग तीन वर्षामध्ये तीन लोकसभेच्या निवडणुका झाल्या.  २०१४ सालामध्ये देश लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेला त्यावेळी युपीएचे सरकार येईल असे वातावरण निर्माण झाले, परंतु भाजपने मुत्सद्दीपणाने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली, गांधी नेहरू परिवाराखेरीज पहिल्यांदा एका व्यक्तीच्या नावाने देशात मते मागितली गेली आणि संवेदनशील असलेल्या जनतेने मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आणि भाजपचे सरकार आले असे तटकरे यांनी सांगितले.

पुढे बोलताना तटकरे म्हणाले, सदाचाराच्या गोष्टी करणारी माणसे परदेशात जास्ती असतात अशी माहिती रामदासभाईणि दिली.   थोडीशी आठ दिवस अगोदर माहिती दिली असती तर त्यांची ऐशी की तैशी करुन टाकली असती. आयुष्यभर स्वतःला वेगळी म्हणवणारी माणसे कशापध्दतीने जीवन जगतात याची माहिती दिल्याबद्दल रामदास कदम यांचे आभार.

दरम्यान, या देशातील संविधान संपुष्टात येईल अशापध्दतीने आज आंबेडकरी चळवळी मध्ये संशय, संभ्रम निर्माण केला जातोय. मतांसाठी समाजासमाजामध्ये अंतर निर्माण करण्याचे पाप करत आहात. मात्र आमचे सर्व जीवन सर्वधर्मसमभावावर गेले आहे आणि या देशाची वाटचाल त्याच पध्दतीने होते आहे असेही तटकरे यांनी सांगितले.

तसेच, खेडला पुराचा धोका कधी उद्भवणार नाही याची खबरदारी यापुढे घेतली जाईल आणि भारत सरकारच्या माध्यमातून तुम्ही म्हणाल तेवढा निधी दिला जाईल असा शब्दही तटकरे यांनी दिला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये