आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रमाहिती तंत्रज्ञान

पोलादपूर तालुक्यात वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

पोलादपूर तालुक्यात मागील ४१ वर्ष तिथीप्रमाणे तीन दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करून महाराष्ट्रातील शिवभक्तां पर्यंत आपल्या देव, देश आणं धर्म कार्याने प्रसिद्धीस पोहचलेले श्रीलक्ष्मीनारायण युवक मंडळ तुर्भे यांनी शालेय वर्षातील पहिला शैक्षणिक सामाजिक बांधिलकीचा वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे येथील माध्यमिक शाळेत महाराष्ट्र दिनी १ मे २०२४ रोजी इयत्ता ५ वी ते १० वी व राजिप शाळा तुर्भे बुद्रुक येथील इयत्ता १ ली ते ४ थी मधील विध्यार्थ्यांना वह्या, पेन, कंपास साहित्य वाटप करून अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजन पुर्वक पार पडला.

Download Aadvaith Global APP

ज्ञानदान करून आपल्या शिष्यांच्या यशस्वीपणासाठी अथक मेहनत घेणाऱ्या *गुरूजणं* शिक्षकांनासुद्धा भेटवस्तू आणि वाचनालयासाठी हिंदवी स्वराज्य स्थापना ऐतिहासिक पुस्तके भेट देण्यात येऊन. इयत्ता ९ वी मधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक घेऊन इयत्ता १० वी मध्ये प्रवेश केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांंना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

आपली ज्ञानजननी म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे विद्यालयायध्ये शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप उपक्रमाकरीता* माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मंगेश उतेकर, तुर्भे हायस्कूल विकास समितीचे अध्यक्ष विष्णूजी उतकेर, कोषाध्यक्ष नानागुरूजी जाधव, तुर्भे युवा प्रतिष्ठान अध्यक्ष पांडुरंग वाडकर, मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल अ. वाडकर, माजी सरपंच नरेश शेलार, सामाजिक कार्यकर्ते नारायण गोळे, वैभव शिंदे उपस्थित होते. शैक्षणिक बांधिलकीचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी दीपकभाऊ गोळे, सिद्धेश शिंदे, सागर महामुनी, विशाल कोंढाळकर यांनी अथक परिश्रम घेतले.

पोलादपूर तालुक्यातील शैक्षणिक प्रश्नासाठी श्रीलक्ष्मीनारायण युवक मंडळ सदैव तत्पर असल्याबाबत अध्यक्ष गणेश मोरे आणि सचिव गणेश शिंदे यांनी भावना व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये