ताज्या घडामोडी

अपघातग्रस्त पर्यटकांच्या मदतीला आमदार गोगावले गेले धावून!

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

महाड चंद्रहास नगरकर

Download Aadvaith Global APP

किल्ले रायगड दर्शन करून परतणाऱ्या पर्यटकांच्या एका खाजगी बसला रविवार 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी कोंझर घाटातील एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली 50 फूट घसरून अपघात झाला होता. बसमध्ये जवळपास 50 प्रवासी होते. यामध्ये स्त्रिया व लहान मुलांचा देखील समावेश होता. घटनेची माहिती मिळताच महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी तातडीने प्रशासकीय सूत्र हलवून मदतकार्य सुरू करण्यास सांगितले. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्परतेने या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नव्हते. या सर्व प्रवाशांची आमदार गोगावले यांनी आपुलकीने चौकशी करून त्यांच्या जेवणाची तसेच त्यांना पुन्हा त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी एसटी बसची देखील व्यवस्था करून दिली. त्यांनी तातडीने केलेल्या या मदतकार्याबद्दल या सर्व प्रवाशांनी आमदार गोगावले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले.यावेळी आपण या बसमधील प्रवाशांशी बातचीत करून या घटनेची सविस्तर माहिती घेतली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये