ताज्या घडामोडी

परप्रांतीय मृत कामगारांच्या कुटुंबीयांना साधना नायट्रोकेम कंपनीचा दिलासा

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

प्रतिनिधी : रुपेश रटाटे

Download Aadvaith Global APP

धाटाव MIDC,प्लॉट नंबर-47 येथील साधना नायट्रोकेम लिमिटेड कंपनीत 11:15 वा च्या सुमारास ODB2 केमिकल प्लांट मध्ये ODB2 प्रॉडक्ट वॉशिंग करण्यासाठी असलेल्या मेथानोल केमिकलच्या स्टोरेज टॅंकवर M.K.फॅब्रिकेटर्सचे 06 कामगार वेल्डिंग काम करीत असताना मेथानोल केमिकल टॅंकचा ब्लास्ट होऊन त्यात 06 कामगार जखमी झाले होते .त्यापैकी 02 कामगार मयत झालेले आहेत व 03 कामगार जखमी अश्या स्वरूपाची प्राथमिक माहिती समोर येते होती, मात्र एका कामगारांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे मृत व्यक्तींचा आकडा हा 03 वरती केला.काल उशीरा पर्यंत मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कंपनी व्यवस्थापनासमोर काही अटी व शर्ती उपस्थित केल्या त्या शिवाय आम्ही अंत्यसंस्कार करणार नसल्याचे सांगण्यात आले तर कंपनी व्यवस्थापनेही विचार विनिमय करून मृत व्यक्तीच्या अंत्य विधी पासून ते कुटुंबियांना आर्थिक स्वरूपाची मदद करण्याचे आश्वासन देण्यात आले तर काही जखमीना उपचारार्थ जाधव नर्सिंग होम, भट हॉस्पिटल रोहा येथे हळविण्यात आले आहे. त्याच्या उपचाराची सर्व जबाबदारी ही कंपनी व्यवस्थापनाची असेल असे कंपनीचे एच आर हेड श्री बेडेकर यांनी स्पष्ट केले.वाढते अपघात या मुळे शेजारी असलेल्या गावांना याचा मोठ्या प्रमाणात हानी पोहचण्याची शक्यता आत्ता वाढू लागली आहे. काल झालेल्या या स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर स्वरूपाची होती, की शेजारी असलेल्या मौजे धाटाव गावातील काही घराचे दरवाजे, खिडक्या जोरात एकमेकांवर धडकल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. कंपनी व्यापस्थान, कामगारांना सेफ्टी विषयक कोणती सावधानी घेते की नाही..? यावर आत्ता प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. वारंवार धाटाव एमआयडीसी मध्ये सतत चे होणारे अपघात आत्ता चिंतेचा विषय होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये