ताज्या घडामोडी

सडे ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश; आमदार गोगावलेंचा करिष्मा कायम 

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

पोलादपूर प्रतिनिधी

Download Aadvaith Global APP

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर आणि विकासाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून महाड विधानसभेत पक्ष प्रवेशाची मालिका ही सुरूच आहे. पोलादपूर तालुक्यातील सडे येथील १०० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी शेकापक्षातून शिवसेनेत बाळासाहेब भवन मुंबई येथे जाहीर प्रवेश केलाय.

आमदार भरतशेठ गोगावले यांनी गेल्या 2 वर्षात ज्या पद्धतीने संपूर्ण मतदार संघात कामे केली आहेत, प्रत्येक गाव वाडी वस्तीवर सामान्य लोकांची विकास कामे झाल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक गावातील लोक आमदार गोगावलेंवर विश्वास ठेवून शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत असल्याचे प्रवेश कर्त्यांनी सांगितले.

सडे गावातील रामचंद्र सालेकर, बाळकृष्ण सालेकर, रामचंद्र सालेकर, नारायण सालेकर , बाळा सालेकर, संजू सालेकर,विठ्ठल सालेकर, मनोहर पवार, सुनील महादेव सालेकर, मंगेश तुळशीराम सालेकर, लक्ष्मण सालेकर, नारायण सालेकर, निवृत्ती सालेकर, कृष्णा सालेकर, रमेश सालेकर, संजय सालेकर, तुकाराम सालेकर, बाळकृष्ण सालेकर यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव, सह संपर्क प्रमुख कृष्णा कदम, युवासेना संपर्क प्रमुख विजय शेलार, महिला संपर्क प्रमुख सुगंधा मोरे, उपतालुका प्रमुख गणपत उतेकर, विभाग प्रमुख विठ्ठल पार्टे, युवा नेते चंद्रकांत सणस, शिवाजी उतेकर इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये