ताज्या घडामोडी

पोलीसांनी सासूरवाडीत सापळा रचून फरार झालेल्या जयदीप आपटेला कल्याणमध्ये केले अटक

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

पोलीसांनी सासूरवाडीत सापळा रचून फरार जयदीप आपटेला कल्याण मध्ये अटक

Download Aadvaith Global APP

मुलुंड प्रतिनीधी सतिश पाटील
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा उभारण्यात आला शिल्पकार जयदीप आपटे याला अखेर अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे याला राहत्या घरातून ताब्यात घेतले.यापूर्वी मालवण येथून पोलीसांचे पथक जयदीप आपटे च्या घरी आले होते.तेव्हा घराला कुलूप होते,जयदीप आपटे अचानक आपल्या राहत्या घरी अवतरला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला.जयदीप आपटेला ताब्यात घेतल्यानंतर लगेचच सिंधुदुर्ग च्या दिशेने रवाना झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26ऑगस्टला कोसळला होता.तेव्हापासून आपटे फरार होता.अनेक दिवसांपासून शोध मोहीम हाती घेतल्यानंतर ही पोलीसांना त्याचा थांगपत्ता लागला नव्हता,त्यामुळे राज्य सरकार व गृहमंत्रालयावर टीकेची झोड उठवली होती.
पोलिसांनी जयदीप आपटे विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती.त्याला शोधनशण्यासाठी पोलीसांनी पाच पथकं विविध ठिकाणी शोध घेत होती. आपटे येवढे दिवस पोलिसांच्या हाती लागला नाही पोलिसाच्या कार्यक्षमतेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु बुधवारी संध्याकाळी अलगदच आपटे पोलिसांच्या हाती लागला.आता पुढील तपासाची पावले सरकण्याची शक्यता आहे.
जयदीप आपटे पोलिस चौकशीत शिवरायांचा 28 फूटी ब्राॅझच्या पुतळ्याबाबत काय माहीती देणार हे पहाव लागेल,या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आणि निकृष्ट साहीत्य वापरण्याचा आरोप केला जात आहे या सगळ्याबद्दल आपटे काय बाजू मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे,याशिवाय जयदीप आपटे याला भारतीय नौदलाने शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम कोणाच्या मार्फत देण्यात आले हे देखील समोर येण्याची शक्यता आहे.मालवण पोलीसांकडून आता जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल या चौकशीत शिवरायांचा पुतळा उभारताना नेमकी कोणती चूक झाली याचे कारण समोर येणार आहे.
गेल्या आठवडय़ापासून मालवण पोलीस, कल्याण, ठाणेग्रामीण पोलीसांचे पाच पथक जयदीप आपटेचा शोध घेत होती.आपटे सासूरवाडीत शहाड येथे लपून बसल्याची माहीती हाती आली होती त्या अनुषंगाने पोलीस पथकाने शहापूर तालुक्यातील हाॅटेल्स,लाॅज,फार्महाऊस शोध घेत होती.कल्याण मधील घराला कुलूप दिसल्यानंतर पोलीसांनी आपटे पत्नीची व माहेच्यांची चौकशी केली होती तसेच जयदीच्या आईचाही जबाब नोंदवला होता.आता पुढील कारवाईकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये