ताज्या घडामोडी

शासकीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात सवाद प्रथम, १७ वर्षे वयोगटात तुर्भे प्रथम तर १९ वर्षे वयोगटात विद्यामंदिर पोलादपूरची बाजी

साने गुरुजी विद्यालयात पोलादपूर तालुका शासकीय क्रीडा स्पर्धेचा उदघाटन सोहळा संपन्न

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

शासकीय क्रीडा १४ वर्षे वयोगटात सवाद प्रथम, १७ वर्षे वयोगटात तुर्भे प्रथम तर १९ वर्षे वयोगटात विद्यामंदिर पोलादपूरची बाजी

Download Aadvaith Global APP

साने गुरुजी विद्यालयात पोलादपूर तालुका शासकीय क्रीडा स्पर्धेचा उदघाटन सोहळा संपन्न

पोलादपूर प्रतिनिधी
पोलादपूर तालुक्याच्या शासकीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सानेगुरुजी विद्यालयाच्या भव्य मैदानात जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांचे हस्ते संपन्न झाला. सहयोग प्रतिष्ठान आणि सह्याद्री स्पोर्ट्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भुषविले. व्यासपिठावर मा. जि. प. सदस्या सुमन कुंभार, पोलादपूरचे गटशिक्षणाधिकारी संजय वसावे,विस्तार अधिकारी सुभाष साळुंखे, शासकीय क्रीडा समिती रायगड जिल्हा समन्वयक श्री सुरवसे, पोलादपूर क्रीडा समितीचे पदाधिकारी दिपक सकपाळ,राजू जाधव,विजय दरेकर, उत्तेकर मॅडम यांसह सहयोगचे विश्वस्त सुखदेव मोरे,सुभाष ढाणे, लीलाजी शेडगे,अँड. विनय हाटे ,सानेगुरुजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम उपस्थित होत्या.

प्रस्ताविकात दिपक सकपाळ यांनी सानेगुरुजी विद्यालयाने सतत तीन वर्षे ह्या स्पर्धा घेण्यासाठी आपले मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल सहयोग प्रतिष्ठानचे विशेष आभार मानले. उद्घाटक चंद्रकांतजी कळंबे यांनी पुढील वर्षी पोलादपूर तालुक्याच्या क्रीडा संकूलनात या स्पर्धा होतील असे आश्वासन दिले आणि या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सतत कटीबद्ध आहोत असे सांगीतले तर अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी तालुक्याचे क्रिडा संकुल लवकरात लवकर व्हावे ही अपेक्षा व्यक्त करुन सह्याद्री स्पोर्ट्स असोसिएशनच्या मार्फत असोसिएशनचे अध्यक्ष अमरजी सलागरे यांचे वतीने देण्यात आलेले बुद्धिबळ संचाचे वाटप माध्यमिक विद्यालयांना प्रदान करण्यात आले.
दिवसभरात झालेल्या १४ वर्षे वयोगट मुले या स्पर्धेत सवाद हायस्कूल विजेते तर मोरसडे हायस्कूल उपविजेते ठरले.१७ वर्षे वयोगट मुले या स्पर्धेत तुर्भे हायस्कूल विजेते ठरले असून उपविजेते सानेगुरुजी विद्यालय लोहारे ठरले आहे. १९ वर्षे वयोगट मुले या स्पर्धेत विद्यामंदिर पोलादपूर विजेते तर वरदायनी हायस्कूल कापडे उप विजेते ठरले आहे. सर्व क्रीडा शिक्षक, व्यवस्थापक, पंचानी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.
सर्व विजेत्यांचे उपस्थित पदाधिकार्यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या दिल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये