ताज्या घडामोडी

अभंग फाउंडेशन डोंबिवली आयोजित पोलादपूर तालुकास्तरीय वारकरी भजन स्पर्धा संपन्न

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

अभंग फाउंडेशन डोंबिवली आयोजित पोलादपूर तालुकास्तरीय वारकरी भजन स्पर्धा 2024 श्री स्वयंभू हनुमान मंदिर विक्रोळी पश्चिम मुंबई येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

Download Aadvaith Global APP

पोलादपूर तालुक्यातील नामांकित 10 भजनी मंडळानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.श्री सरस्वती माता पूजन, श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान पूजन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा श्री शिव छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून, दीप प्रजनन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळी १०.३० ते सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत भक्तिमय वातावरणात कार्यक्रम सुरू होता.कार्यक्रमासाठी लाभलेले परीक्षक महाराष्ट्रातील नामांकित गायनचार्य ह भ प श्री नारायण महाराज खिल्लारी गुरुजी, पखवाज विशारद ह भ प निळोबाराय गोठणकर व समन्वयक म्हणून मुख्य भूमिका बजावली ते पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र कोकण रत्न ह भ प श्री अंकुश महाराज कुमठेकर गायनाचार्य, मृदुंगचार्य घाटकोपर,अभंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ह भ प सोपानदादा मोरे यांनी भव्य दिव्य असे वारकरी संप्रदायिक भजन स्पर्धेच आयोजन केलं होतं.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री गणेश केसरकर यांनी नियोजनबद्ध केली प्रास्ताविक भाषण ह भ प श्री उत्तम जाधव यांनी केले.
पोलादपूर तालुक्यातील राजकीय कला क्रीडा,सामाजिक शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील नामवंतांची मांदियालीच अवतरली होती, कीर्तनकार प्रवचनकार, गायनचार्य , मृदुंगचार्य, व ज्येष्ठ नागरिकांची विशेष उपस्थिती लाभली.
बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले सद्गुरु श्री दादामहाराज मोरे माऊली ( अधिष्ठानपती श्रीसंत मोरे माऊली संप्रदाय ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले

प्रथम क्रमांक राधा कृष्ण भजन मंडळ डोंबिवली मुक्काम पोस्ट कोतवाल,

द्वितीय क्रमांक :- श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ घाटकोपर मुक्काम पोस्ट बोरज

तृतीय क्रमांक :- श्री जननी कुंबळजाय भजन मंडळ घाटकोपर मु. पो.खोपड

उत्तेजनार्थ क्रमांक :- महाकाली भजन मंडळ मु. पो.काटेतली अंबरनाथ

ताल संच क्रमांक :- गोळेगणी ग्रामस्थ मंडळ, अंबरनाथ

उत्कृष्ट गायक :-श्रीराम भजन मंडळ काटेतली, श्री ह भ प किरण महाराज मोरे

उत्कृष्ट वादक :- कांगोरीगड भजन मंडळ मु. पो.सडे ह भ प श्री धीरज शिंदे

आयोजक श्री सोपान दादा मोरे, व अभंग फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.

सद्गुरु श्री दादामहाराज मोरे माऊली अधिष्ठानपती श्री संत मोरे माऊली संप्रदाय यांनी प्रबोधनपर भाषण करून शुभ आशीर्वाद दिले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये