ताज्या घडामोडी

सानेगाव आश्रम शाळेसाठी धावून आले रिलायन्स फाउंडेशन

रिलायन्स फाउंडेशन नी दिले बसण्याचे बेंच

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

रुपेश रटाटे

Download Aadvaith Global APP

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक सानेगाव आश्रम शाळा येथे गेली कित्येक वर्ष शाळेमध्ये शिकणारी सर्व निवासी मुलं हि वर्गामध्ये खाली जमिनीवर बसून शिकत होते,परंतु श्री मिथुन जोगळेकर पदवीधर शिक्षक यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून शाळेला रिलायन्स फाउंडेशन यांच्याकडून जुने बेंचस कसे उपलब्ध होतील हे पाहिले गेले.बेंचेस साठी रिलायन्स फाउंडेशन कडे मागील काही दिवस पर्यंत करत होते. रिलायन्स फाउंडेशनचे अधिकारी श्री.अरविंद बुरूमकर यांच्याशी संपर्क साधून या बेंचेस साठी पाठपुरावा करण्यात आले.या साठीचा प्रस्थाव श्री बुरूमकर यांनी रिलायन्स फाऊंडेशन कडे ठेवला व याविषयी माहिती दिली तात्काळ या साठी मान्यता सुद्धा देण्यात आली.तर लगेचच शासकीय आश्रम शाळा सानेगाव यांना मंजूर करण्यात आले, मंजूर झालेले बेचेस शाळेमध्ये आणण्यासाठी श्री मिथुन जोगळेकर यांनी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री मधुकर रावजी फसाळे व शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार चेंडके सर यांच्याशी बोलणे सुरू केले व बेंच आणण्याची सोय कशी करता येईल हे प्रामुख्याने पाहिलं गेलं.त्यानंतर शाळेसाठी लागणारे ताब्यात घेण्यात आले.लाखो रुपयाचे असणारे ही अमूल्य अशी भेट रिलायन्स फाउंडेशन कडून आपल्या शाळेसाठी मिळवण्यासाठी श्री मिथुन जोगळेकर यांनी खूप प्रयत्न केले.त्यामुळे आज गेली कित्येक वर्ष जमिनीवर बसून धडे गिरवणारी मुलं चांगल्या बाकड्यांवर बसून शिक्षण घेऊ लागली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालं. श्री मधुकर फसाळे सर यांचे विशेष कौतुक झालं तसेच श्री राजकुमार चेंडके सर यांच कौतुक झाल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये