ताज्या घडामोडी

गोवंश वाहतूक करणाऱ्या चार जणांचा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल 

गोरक्षकांनी फिल्मी स्टाईलने केला पाठलाग

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

प्रतिनिधी सिताराम कळंबे

Download Aadvaith Global APP

पोलादपूर महाबळेश्वर मार्गवर कापडे गावाच्या हद्दीत विनापरवाना गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच गोरक्षक यांनी वाहतुकीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. सदरची घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलादपूर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत चार आरोपीना अटक केल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्यामार्फत देण्यात आली.

वाढती गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक नेहमीच मेहनत घेत असून शुक्रवारी रात्री पोलादपूर येथील गोरक्षकांनी प्रशासनाच्या सहाय्याने स्थानिकांच्या मदतीने पोलादपूर कापडे नाका येथे मोठी कारवाई केली आहे.

रात्री आरोपी जावेद वालवटकर हा एम एच ०८ ए.पी. ५३५२ महिंद्रा बोरेलो पिकअप मध्ये सहा गोवंश गाईंना घेऊन नफ्याच्या उद्देशाने कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षक यांना समजल्यानंतर रात्री गोरक्षकांनी सापळा रचून गो तस्करांचा कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. पोलादपूर तालुक्यातील कापडे नाका येथे बोलेरो गाडी पकडून कत्तलीसाठी नेत असलेल्या सहा गाईंना जीवदान मिळाले असून चार आरोपीना अटक करण्यात आली आहे.

 

तसेच या घटनेबाबत १३ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जावेद वालवटकर,सज्जाद,रियाज कचकोल,आसिम कुदेकर,फाईक मदगडी,नाशिर हकीम,रफिक उलडे,मोतशीम,नईफ बाबर, शाहिद खान,इरफान,अन्वय सय्यद,मंगेश खेडेकर अशी आरोपींची नावे असून अधिक तपास पोलादपूर पोलीस करीत आहेत.

या कार्यवाहीत बोलेरो पिकअप नं एम.एच.०८ ए.पी.५३५२ किंमत ५,००,०००, एक तांबड्या रंगाची गाय, मोठे शिंग असलेली किंमत ३०,०००, एक ताबड्या रंगाची गाय, मोठे शिंग असलेली किंमत ३५,०००, एक तांबड्या रंगाची गाय, आखुड शिंग असलेली किंमत . २५,०००, एक गर्द तांबंड्या रंगाची गाय, लांब शिंग असलेली किंमत . २०,०००, एक काळया रंगाचा वासरु आखुड शिंग असलेली किंमत १५,००० एक ताबड्या रंगाचा कालवड असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या गुन्ह्याची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं.७२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३२५ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सुधारणा १९९५ चेक कलम ५,५ (अ).( ब) ९,११ महाराष्ट्र कीपिंग मुव्हमुंट ऑफ कॅटर इन अर्बन एरिया कंट्रोल ऍक्ट कलम ३ पशु क्रूरता अधिनियम कलम ११(१) पशु वाहतूक अधिनियम कलम ४७ अ, ब कलम ४८ ५४(१,२,३) मो. वा.का.क.६६/१९२ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माने,पोलीस ठाणे अंमलदार पो. ह. श्री कोंडाळकर हे करीत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये