ताज्या घडामोडी

राजिवली येथे नवजीवन बौद्ध विकास मंडळाकडून वृक्षारोपण 

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा
महाड प्रतिनिधी
          महाड तालुक्यातील राजिवली येथे नवजीवन बौद्ध विकास मंडळाकडून ३ ऑगस्ट २०२४ रोजी राजिवलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा, लुम्बिनी बुद्ध विहार परिसर आदी ठिकाणी  ग्रामस्थांकडून वृक्षारोपण करण्यात आले.
 जागतिक तापमानवाढ, वातावरणातील कमी होणारा ओझोन वायुचा थर यामुळे पर्यावरणात बदल होत असून यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितली. आमच्या काळात रस्त्याच्या कडेला झाडे मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे सावली सहजच उपलब्ध होत असे, मात्र आता सावली शोधावी लागते, ही शोकांतीला असल्याचे येथील वयोवृद्धानी सांगितले. नवजीवन बौद्ध विकास मंडळाकडून करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
        यावेळी ग्रामपंचायत सरपंच मा. कॅप्टन मधुकर जाधव, मा. अध्यक्ष भिकूराम कासारे, अध्यक्ष गंगाधर सोनावणे, उपाध्यक्ष धर्मेंद्र जाधव, सचिव अजित कासारे, सहसचिव संजय कासारे, खजिनदार सूर्यकांत जाधव, मा. अध्यक्ष विश्वनाथ कासारे, स्थानिक अध्यक्ष चरण कासारे, उपाध्यक्ष दीपक कासारे, कृष्णा कासारे रत्नाकर कासारे, मोतीराम कासारे, दीपक जाधव, सुरज जाधव, प्रमोद कासारे, रवींद्र कासारे, किरण जाधव, गिरीश कासारे यांसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
   झाडे लावणे ही काळाची गरज असून झाडे लावा, झाडे जगवा ह्या महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार आम्ही आज वृक्ष लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यासाठी गाव कमिटी, मुंबई कमिटी यांचे सहकार्य लाभले. भावी पिडीला प्राणवायू ची कमतरता भासू नये यासाठी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
मधुकर जाधव(सरपंच, राजिवली)

Download Aadvaith Global APP
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये