ताज्या घडामोडी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेव्हर ब्लॉकने भरलेले खड्डे गणपती पूर्वी राहतील का? 

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

महाड (मिलिंद माने) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील खड्ड्यांना पेवर ब्लॉकचा मुलामा देण्याचे काम सध्या जोमाने चालू आहे हे पेवर ब्लॉक गणपतीपूर्वी व्यवस्थित राहतील का असा सवाल या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या असंख्य वाहन चालकांसहित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे

Download Aadvaith Global APP

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सलग १७ वर्ष कोकणातील चाकरमान्यांनी खड्ड्यातून प्रवास केला आहे. तशीच परिस्थिती यावर्षी देखील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे पळस्पे फाट्यापासून कशेडी घाटापर्यंत अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे मात्र हे कॉंक्रिटीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी महामार्गावरील या काँक्रिटीकरणाच्या रस्त्याला तडे गेले आहेत तर लोणेरा कोलाड व नागोठणे ते कासू व गडब , आमटेम या ठिकाणचा रस्ता अद्याप कॉंक्रिटीकरण न झाल्याने व त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण केल्याने त्या डांबरीकरणाची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे त्यामुळे महामार्गावर जागोजागी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे त्यातच शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी मुंबई पुण्याकडून गावाकडे जाणाऱ्या असंख्य वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी तर होतेच परंतु एखादे अवजड वाहन बंद पडल्यास ते देखील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे

कोकणातील गणेशोत्सव सण हा सप्टेंबर महिन्यात येत असून सात सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे मात्र आठ दिवस अगोदर म्हणजे एक सप्टेंबर पासून कोकणात चाकरमान्यांची वर्दळ चालू होणार आहे त्यामुळे या महामार्गावर एसटी बस सहित खाजगी बसेस व हजारो कार रस्त्यावर . येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी केवळ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे होणार आहे

 

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पडलेल्या खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतुकीचे विघ्न दूर करण्यासाठी व कोकणातील चाकरमान्यांच्या रोशाला राष्ट्रीय महामार्ग सरकारला सामोरे जावे लागणार असल्याने तात्पुरती मलमपट्टी म्हणून पेवर ब्लॉकने खड्डे भरण्याचा नामी उपाय राष्ट्रीय महामार्ग खात्याने अवलंबला आहे त्यासाठी जागोजागी पेपर ब्लॉकने खड्डे भरण्याचे काम जोमाने चालू झाले आहे मात्र पेवर ब्लॉकने केलेला रस्ता बरोबर एक महिन्यांनी येणाऱ्या गणेशोत्सवा काळात पर्यंत टिकून राहील का कारण वाहनाच्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने या महामार्गावरून होणारी ओव्हरलोड वाहतूक हे पेवर ब्लॉक सहन करतील का असा अहवाल राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी विचारला आहे त्याचबरोबर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा पूर्वीचा डांबरीकरणाने तयार केलेला होता त्या काळात वापरण्यात आलेल्या डांबर व आता रस्त्यासाठी वापरण्यात येत असलेली डांबर याच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याने पूर्वीचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो इंदापूर शहरातली तसेच माणगाव शहरातील रस्ता अजूनही जुन्या डांबरीकरणाचा टिकलेला आहे त्याची गुणवत्ता आता डांबरीकरण करत असलेल्या महामार्गाच्या रस्त्याची गुणवत्ता यामध्ये संशोधनाची गरज असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले

 

एकंदरीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना पेवर ब्लॉकचा मुलामा देण्याचे काम चालू आहे मात्र महिन्याभरात या रस्त्यावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे हा पेवर ब्लॉकचा रस्ता टिकेल का याबाबत कोकणातील जनतेच्या मनात शंका उत्पन्न होत आहे तसेच जन आक्रोश समितीमार्फत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठरो२८ जुलै रोजी. होम हवन केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी जागे झाले असले तरी १५ऑगस्ट . स्वातंत्र्य दिना पासून पुन्हा जन आक्रोश समितीमार्फत माणगाव येथे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे पुन्हा एकदा कोकणातील जनतेमधून राज्य सरकार व केंद्र सरकारच्या महामार्गाच्या धोरणाबाबत नाराजीचा सूर उमटत असून आता कोकणातील जनता या महामार्गाच्या दुरावस्थेबाबत रस्त्यावर उतरणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत

 

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतूक पोलिसांना डोकेदुखी!

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या दुरावस्थेमुळे वारंवार अवजड वाहने महामार्गावर बंद पडून अथवा रस्त्याची साईड पट्टी मजबूत नसल्याने घसरून अपघात होत असल्याने व त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला दररोज सामोरे जाताना महामार्ग वाहतूक पोलिसांना ते डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे एक तर कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे व वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पावसात भिजत वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न महामार्ग वाहतूक पोलिसांना दिवस-रात्र करावे लागत असल्याने वाहतूक पोलीस देखील या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झाले आहेत दररोज पावसात भिजून वाहतूक कोंडी दूर करण्याचे व महामार्गावर बंद पडलेल्या अवजड वाहनांना रस्त्यापासून दूर हटवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या परिश्रमामुळे अनेक वाहतूक पोलिस पावसात भिजावे लागल्याने आजारी पडल्याचे सांगण्यात येत आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये