ताज्या घडामोडी

ताम्हिणी घाट खचला २ ऑगस्ट पासून ५ ऑगस्ट पर्यंत वाहतुकीसाठी बंद

पुण्याला जायचे कसे माणगाव महाड पोलादपूरकरांचा प्रश्न?

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

महाड (मिलिंद माने) रायगड व पुणे जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाटातील रस्ता खचला असल्याने रस्ता दुरुस्तीच्या कारणासाठी दोन ऑगस्ट दुपारी बारा वाजल्यापासून पाच ऑगस्ट सकाळी आठ वाजेपर्यंत या घाटातून वाहतूक बंद करण्याचे निर्देश पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी काढले आहेत
पुणे जिल्ह्यातील पुणे ते मालेगाव ते पुणे रायगड जिल्हा हद्दीपर्यंत रुंदीकरणाचे काम चालू असून पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे पुणे जिल्ह्यातील आदरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर साखळी क्रमांक ६३/००० या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे महामार्ग पूर्ण बंद ठेवण्यात आला होता या दुर्घटनेमुळे हॉटेल पिकनिक येथील फॅमिली हॉटेल मधील एका व्यक्तीचा मृत्यू व एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना देखील यादरडीदरम्यान घडली होती
पुणे जिल्ह्यातील आधारवाडी व डोंगरवाडी गाव येथे एक ऑगस्ट रोजी पुणे ताम्हिणी क्रमांक ७५३ वर साखळी क्रमांक६१/६५० ते६१/६८० मध्ये रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तळा गेला असून रस्ता पूर्णपणे खचला आहे हा घाट वनपरिक्षेत्रात असून पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या अति मुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे रक्ता खटलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू आहे व रस्त्याचे काम करण्यासाठी वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सुरू असून आत्ता या महामार्गावरील वाहतूक एका बाजूने चालू ठेवलेली आहे परंतु पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यास हा रस्ता अजून खचण्याची व अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या महामार्गावरील नियमित वाहतूक चालू ठेवणे धोकादायक आहे
रायगड जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या ताम्हिणी घाटात पुणे व रायगड जिल्ह्यात शनिवार व रविवारी या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक यजा करतात यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मार्ग बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील आधारवाडी व डोंगरवाडी गाव येथील भागात खटलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी दोन ऑगस्ट 2024 पासून 5 ऑगस्ट सकाळी आठ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश पारित केले आहे
रायगड जिल्ह्यातून पुण्याला जाणारा वरंधघाट आधीच बंद आहे त्यामुळे पोलादपूर महाड माणगाव तसेच रोहा व श्रीवर्धन विभागातील नागरिकांना पुणे येथे जाण्यासाठी एकमेव असलेला ताम्हणी घाट दोन ऑगस्ट पासून पाच ऑगस्ट पर्यंत म्हणजे तब्बल दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने या परिसरातील नागरिकांनी कोणत्या रस्त्याने जायचे असा सवाल राज्य शासनाला केला आहे दरवर्षी पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडीमुळे घाट परिसरातील रस्ते बंद होतात याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी का करीत नाहीत असा सवाल वाहतूकदार संघटनेकडून विचारला जात आहे

Download Aadvaith Global APP
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये