ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलादपूर क्षेत्रपाल कुडपण रस्त्यावरती कोसळली दरड; वाहतूक तात्पुरती बंद

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

पोलादपूर संदिप जाबडे

Download Aadvaith Global APP

पोलादपूर तालुका हा दरडग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. पोलादपूर तालुक्यातील बहुतांशी गावे डोंगर माथ्यावर असल्याने येथे जाणार रस्ते देखील डोंगरातून किंवा डोंगर फोडून काढण्यात आले आहेत. पावसाळ्यात पावसाचे प्रमाण वाढले की या रस्त्यांवर दरड कोसळण्याचे सत्र हे सुरू झाल्याचे पाहायला मिळते. पोलादपूर कुडपण या रस्त्यावर तर पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रमाण अधिकच आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या वेळेस पोलादपूर क्षेत्रपाल कुडपण रस्त्यावर दरड कोसळून महाकाय दगड रस्त्यावर आल्याची घटना घडली आहे. क्षेत्रपाल हद्दीत कोसळलेल्या या दगडामुळे कुडपण कडून पोलादपूर कडे जाणारी एसटी बस येथे अडकली असून या बसमध्ये सकाळी बसमध्ये प्रवास करणारे शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापनाला मिळताच तहसिलदार कपिल घोरपडे यांच्या पुढाकाराने तातडीने दरड हटविण्यासाठी जी सी बी घटनास्थळी पाठविला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये