महाराष्ट्रराजकीय

पोलादपूर नगरपंचायत स्वीकृत नगरसेवक पदी शिवराज पार्टे यांची बिनविरोध निवड 

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

पोलादपूर प्रतिनिधी

Download Aadvaith Global APP

पोलादपूर नगरपंचायत कार्यालय येथे २९ जुलै २०२४ रोजी झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिवराज पार्टे यांची स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड झालेली आहे.

पोलादपूर नगरपंचायतचे माजी नगरसेवक संतोष चव्हाण यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा अडीच वर्षानंतर राजीनामा दिल्यानंतर नगरपंचायत कार्यालय येथे निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याधिकारी विराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवराज पार्टे यांची स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे शिवराज पार्टे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत असून शिवराज पार्टे हे नेहमी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतात. पोलादपूर पत्रकार संघाचे देखील अध्यक्ष आहेत. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हनुमंत नाना जगताप ,महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, पोलादपूर तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, विरोधी पक्षनेते दिलीप भागवत,शहर प्रमुख निलेश सुतार, शहर संघटक अमोल भुवड, नगरसेवक स्वप्निल भुवड, निखिल कापडेकर, नगरसेविका श्रावणी शहा, सानवी गायकवाड, तेजस्वी गरुड, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कदम, तालुका संघटिका अश्विनी गांधी,युवा सेनेचे अमरदीप नगरकर, संतोष चिकने, ,प्रसन्न बुटाला,महेश दरेकर , कोंढवी विभाग प्रमुख मंगेश मोरे,माजी सरपंच प्रदीप नरे, सरपंच दिपक पवार यांच्यासह अनेकांनी शिवराज पार्टे यांना शुभेच्छा दिल्या आहेत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये