आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

१८ वर्षानंतर मेढा हायस्कूलचे मित्र मैत्रीण आले एकत्र

जोशी सरांना पाहून प्रत्येकच्या चेहऱ्यावर स्मित हास्य

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

रोहा धाटाव : रुपेश रटाटे

Download Aadvaith Global APP

रोहा तालुक्यातील मेढा हायस्कूल येथील इयत्ता 10 वी पास सन 2006 मधील बॅचचा गेट टूगेदर कार्यक्रम रविवार दि.28 जुलै 2024 रोजी निसर्गाच्या सानिध्यात मोठ्या संख्येने मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला.
गेल्या 18 वर्षा नंतरची मैत्री भेट, स्नेह मेळावा म्हणजे विखुरलेले मित्र मैत्रिणी एकत्र करणे व सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणे व सर्वाना सोबत घेऊन पुढे जाणे हा होता. यावेळी उपस्थीत सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता.
या कार्यक्रमात अनेकांनी आपल्या जून्या आठवणींना उजाळा दिला तर काहींनी 90 च्या दशकातील आम्ही मित्र मैत्रिणी मोबाईल व सोशीयल मिडिया नसल्यामुळे आम्ही विखुरले गेलो होतो हे सुद्धा आवर्जून सांगितले 18 वर्षांचा दुरावा आम्हांला दूर करायचा होता. आम्ही मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन आमच्यातलेच मित्र मैत्रिणी आज देशातच नव्हे तर विदेशात देखील चांगल्या पदावर कार्यरत आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो.
इयत्ता 10 वी नंतर पूर्णतः विखुरले गेलेलो आम्ही मित्र मैत्रिणी आज 18 वर्षांच्या प्रदिर्घ काळानंतर या सोशीयल मिडियामुळे एकत्र आलो. या स्नेह मेळाव्यात तब्बल 35 ते 40 मित्र मैत्रिणी उपस्थित होते. सर्वांनी स्वतः चे मनोगत व्यक्त केले व आपण इयत्ता 10 वी नंतर काय केलं व आता काय करतो आहोत हे सांगितले.
आमच्या आता पर्यंतच्या आयुष्यात असा स्नेह मेळावा कधी झालाच नाही. या स्नेह मेळाव्यासाठी आलेले मित्र मैत्रिणीं आणि श्री जोशी सर यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. सर्वांच्या एकत्रित गप्पा टप्पा,गाण्याच्या भेड्या,धमाल मस्ती ने सर्वच भारावून गेले.
हा दिवस म्हणजे उपस्थित सर्वांच्या जीवनातील सोनेरी अक्षरात लिहून ठेवावा असा हा दिवस होता.त्यानंतर
दुपारचे जेवण करून परिसरात वृक्षारोपण करून श्री जोशी सर यांना सन्मानित करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये