आपला जिल्हामहाराष्ट्र

पोलादपूरकरांना २६ जुलैची काळरात्रीची भीती कायम

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

पोलादपूर संदिप जाबडे२

Download Aadvaith Global APP

६ जुलै २००५मध्ये भरपावसात पोलादपूरमधील दोन गावांना दरड मातीने गिळंकृत केले होते. या नैसर्गिक आपत्तीला आज 19 वर्षे झाली आहेत. आजही या आठवणी कायमच्या मनी बसल्याने मुसळधार पावसात दाटून येत आहेत आजही त्या रात्रीच्या भयाण आपत्तीचे चित्र डोळ्यासमोर उभेराहात अंगावर काटा उमटत आहे

भू-वैज्ञानिकांच्या अहवालानुसार, दरडींच्या दहशतीखाली पोलादपूरमधील असंख्य गावे व अनेक आदिवासी, बौद्ध आळी, धनगर वाडया देवावर हवाला ठेवून जगत आहेत. तालुक्यातील कोतवाल खुर्द, कोंढवी आणि लोहारे पवारवाडीतील 25 व 26 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान महापूर व भूस्खलनाच्या घटनांनंतर तालुक्यातील दरडग्रस्त गावांतीळ नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असले तरी शासनाने दरदग्रस्त गावाचा सर्व्हे करत ठोस उपाययोजना करणे गरजचे बनले आहे

25 व 26 जुलै 2005 या अतिवृष्टी व भूस्खलन तसेच महापूर आल्याच्या नैसर्गिक आपत्तीनंतर तालुक्यात नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष पावसाळी कार्यरत ठेवण्यात येत आहे या सन 2005 च्या नैसर्गिक आपत्तीनंतर कोतवाल खुर्द आणि बुद्रुकच्या दरडग्रस्तांसाठी 28 घरकुलं उभी राहतील एवढे क्षेत्र तर कोंढवी येथे 29 घरकुलं उभी राहतील एवढे क्षेत्र उपलब्ध करण्यात येऊन पुनर्वसनाचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले होते सिध्दीविनायक ट्रस्ट, मुंबईने याकामी खर्चाची जबाबदारी उचलली. कोतवालमध्ये दरडग्रस्तांची संख्या 48 तर कोंढवी येथे 78 कुटूंबे अशी असताना दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 45 लाख रूपये खर्चातून केवळ 15-15 घरकुलं उभारण्यात आली. मात्र बांधण्यात आलेल्या घराचा दर्जा 18 वर्षात खालावला असल्याचे चित्र दिसत आहे

2005च्या नैसर्गिक आपत्ती मध्ये तालुक्याचे नुकसान झाले होते सावित्री चा महापूर मध्ये चार गावाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती सुमारे 3 हजार च्या आसपास नागरिक बाधित झाले होते त्या पोटी नैसर्गिक आपत्ती आराखडा नुसार शासना कडून 27लाख 89 हजार 675 रुपये वाटप करण्यात आले होते तर दरड कोसल्याने झालेल्या आपत्ती वेळी 13 गावातील 1500 नागरिकांना मोठी झळ बसली होती या मध्ये पोलादपूर पार्ले , कालवली, तुटवली, कोतवाल बु., लोहारे, महाळुंगे, ओबळी, पैठण, महाळगुर, साळविकोंड , केवनाळे, कोतवाल या गावाचसमावेश होता या वेळी शासन कडून मदत निहाय 13 लाख रुपये तर पुर्नवसन साठी 7 लाख40 हजार रूपये खर्ची झाले होते या नैसर्गिक आपत्ती मध्ये लोहारे (चव्हाण वाडी)- 3, कोतवाल खु 3. कोतवाल बु 7 नागरिकांचा मृत्यू झाला होता

२६ जुलै २००५ ची काळरात्र! या रात्री झालेल्या अतिवृष्टी व भस्सखलनाने पोलादपूरचे होत्याचे नव्हते झाले. काही तरी अनुचित घडणार याची चाहूल २५ जुलैच्या रात्रीच लागली होती. या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर आला. या पुराचे पाणी पोलादपूर शहराच्या शिवाजी नगर, सिद्धेश्वर नगर, भैरवनाथ नगर या भागात शिरले. हाहाकार उडाला. महापुराच्या प्रचंड पाण्याच्या लोंढयाने नदीकाठावरील मासळी बाजार, गंगामाता हॉल, सिद्धेश्वर मंदिर, सुंदरराव मोरे महाविद्यालय, सार्वजनिक वाचनालय, वीज कंपनीचे गोदाम, चित्रे घाट मंदिर, बंडू चित्रे चाळ या इमारतींना वाहून नेताना अनेक घरेही पाण्याखाली गेली होती

ही भयानक घटना घडत असतानाच, २६ जुलैच्या मध्यरात्री पोलादपूर सैनिकनगर, पार्ले, कालवली, तटवली, गोळेगणी, कुडपण, लोहारे, भोगाव, साळवीकोंड, धामणदेवी, केवनाळे, किनेश्वर, पायटा, बोरावळे, भोलदरा, महादेवाचा मुरा या गावांतील हद्दीतील डोंगरांना भेगा पडल्या. घरांना तडे गेले. दरडी कोसळल्या. यापैकी लोहारे चव्हाणवाडी तीन, कोतवाल खुर्द, तीन, कोतवाल बुद्रुक सात या तीन गावांत दरडींखाली १३ जण गाडले गेले. महापुरात अनेक जनावरांसह दोन महिला वाहून गेल्या. संपूर्ण तालुक्यात विजेचे खांब कोसळून कित्येक दिवस तालुका अंधरात बुडाला होता. दिवील येथील के. टी. बंधारा व कोतवाल-पैठण येथील पूल वाहून गेल्याचा घटना घडल्या होत्या

मुंबई-गोवा महामार्गा वरील भोगाव गावाच्या हद्दीत सव्वाशे मीटर लांब व ५० फूट उंचीचा डोंगर आला. गावोगावचे अंतर्गत रस्ते, साकव, बंधारे, संरक्षण भिंती, समशान शेड, नळपाणी योजना, नेस्तनाबूत झाल्या होत्या. भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. अनेक संसार उघडयावर आले. निसर्गाच्या या प्रकोपाची आठवण ‘आजही कायम स्वरूपी उमटून जात आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये