आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

सत्तेच्या चाव्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती राहणार 

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

सत्तेच्या चाव्या मनसेच्या हाती राहणार

Download Aadvaith Global APP

वैभव खेडेकर

महाड (मिलिंद माने) महाराष्ट्र विधानसभेच्या जागा मनसे लढवण्याच्या तयारीत असून 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 200 ते 225 विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करणार असून राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी मनिश्चित गरज लागणार असून सत्तेच्या चाव्या मनसेच्या खाती राहतील असे . मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे

राज्यात एक ऑगस्ट पासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर निघणारा आहेत महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती बदलली आहे तिचा नक्कीच फायदा मनसेला होणार असल्याचे वैभव खेडेकर यांनी सांगितले

 

तिघांच्यात पार्टनर मनसे होणार नाही!

राज्यात भाजपा शिंदे सेना व अजित पवारांची राष्ट्रवादी हे तिघही महायुतीमध्ये आहेत विधानसभा निवडणूक लढवताना या तिघांच्या युतीत चौथा पार्टनर होण्याच्या मनस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसल्याचे वैभव खेडेकर यांनी स्पष्ट केले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन तसेच एकंदरीत महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती लक्षात घेता मनसे येत्या निवडणुकीत 200 ते 225 जागा लढवेल व सत्तेच्या चाव्या मनसेच्या हाती राहतील असा आत्मविश्वास मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये