आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

आदिवासी जनहिताय विकास सेवा संघ मुंबई यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य वाटप

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

महाड संदिप जाबडे

Download Aadvaith Global APP

मागील सहा वर्षांपासून रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे जिल्ह्यांमध्ये सामाजिक शैक्षणिक व विविध समाज उपयोगी उपक्रम राबविणार्‍या आदिवासी जनहिताय सेवा संघाकडून गरीब गरजू व दिव्यांग आदिवासी विद्यार्थ्यांना 6 जुलै 2024 रोजी विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील प्राथमिक शाळा शेल, करंजाडी वाणीकोंड, इत्यादी शाळांना दप्तर, पेन, पेन्सिल व इतर आरोग्य विषयक साहित्याचे वाटप करण्यात आले. स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळेस करण्यात आला. दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आली. यानंतर संघटनेचे अध्यक्ष महेंद्र मोरे यांनी संघटनेची कार्य, व्याप्ती व उद्दिष्टे सांगितली. स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन आहे, यातूनच आदर्श नागरिक तयार व्हावेत हे संघटनेचे ध्येय असून शालेय विद्यार्थ्यांना आदिवासी जनहिताय सेवा संघ नेहमीच विविध उपक्रमांच्या माध्यमातून सतत मदतीचा हात देऊन सहकार्य करत असल्याचे सांगितले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संगीता पवार यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे योगदान व कार्य कौतुकास्पद असून गरीब गरजू अनाथ मुलांना याचा फायदा होत असल्याचे सांगितले. आपण शैक्षणिक कार्यात मोलाचे कार्य करीत असल्याने विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम होत असल्याचे सुतोवाच काढले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष महेंद्र मोरे, उपाध्यक्ष संतोष सुर्वे, सचिव महेंद्र पवार, महाड शाखेचे अध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, सदस्य सुधीर शिंदे, बाजीराव सुर्वे, रुपेश सुर्वे, सल्लागार अनंत दासगावकर, शंकर पवार, प्रितम पलंगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संगीता पवार, सुभाष सावंत, मुख्याध्यापिका संपदा उमापे, शिक्षक शिवाजी यादव, करंजाडी वाणीकोंड शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा माळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रणजित बेल, सुदर्शन कंपनी सि एस आर चे अधिकारी दिशांत ढाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये