आपला जिल्हामहाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्ग खात्याचा बेजबाबदार पणाच्या धोरणामुळे भुयारी मार्गात पाणी शिरल्याने वीर टोळ आंबेत रस्ता बंद

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

महाड (मिलिंद माने):  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मागील 18 वर्ष कोकणातील चाकरमान्यांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागत असताना याच महामार्गावरील भुयारी मार्गात पाणी साठल्याने वीर टोळ आंबेत मार्ग बंद झाल्याने 15 गावांचा संपर्क तुटला आहे याबाबत तातडीने राष्ट्रीय महामार्ग खात्याने दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हा सरचिटणीस व टोळ ग्रामपंचायतीच्या. सौ संचिता निगुडकर यांनी दिला आहे

Download Aadvaith Global APP

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील वीर टोळ मार्गे आंबेत कडे जाणाऱ्या मार्गावर टोळ फाटा येथे उड्डाणपूल बांधण्यात आला आहे या उड्डाणपुलाखाली आंबेतला जाण्यासाठी व आंबेत वरून मुंबईला जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील टोळ फाटा येथे असणाऱ्या भुयारी मार्गाला पाणी जाण्यासाठी मार्गच ठेवला नाही तसेच वीर गावातून महाड कडे जाण्यासाठी असणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग खात्याने अर्धवट अवस्थेत ठेवला असून त्यामुळे पुलावरून येणारे सर्व पाणी या भुयारी मार्गात साठत असल्याने भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे हे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही मार्ग नलिका ठेवण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग खात्याने केले नसल्याने पुलामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने सुमारे 15 गावांचा संपर्क तुटला आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील टोळ फाटा येथे असणाऱ्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने आज सकाळपासूनच हा मार्ग पूर्णतः पाण्याने भरला आहे त्यामुळे टोळ फाट्यावरून आंबेत मार्गे जाणाऱ्या वाहनांना त्याचा फटका बसला असून सुमारे 15 गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे याबाबत राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा फटका महाड तालुक्यातील टोळ परिसरातील 15 गावांना बसला असून याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हा सरचिटणीस व टोळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ संचिता निगुडकर यांनी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोल पुलाव वरील भुयारी मार्गात साठलेल्या पाण्याबाबत तातडीने उपाययोजना करावी तसेच वीर गावातून महाड कडे जाणाऱ्या सर्विस रोडचे काम देखील पूर्ण करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे अन्यथा राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या विरोधात टोळ परिसरातील 15 गावातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हा सरचिटणीस व टोळ ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ संचिता निगुडकर यांनी दिला आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये