आपला जिल्हा

कोलाड विभागातील चिंचवली गावचे सुपुत्र रोशन सुजाता संजय येरुणकर सीए ची परिक्षा उत्तीर्ण

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

रोहा रुपेश राटाटे

Download Aadvaith Global APP

कोलाड विभागातील चिंचवली गावचे सुपुत्र रोशन येरुणकर यांनी सीए ची परिक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केली . रोशन येरुणकर यांनी पहिले ते सातवीपर्यंत शिक्षण रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले .पुढील शिक्षण त्यांनी विरार येथे घेतले .त्यांचे शिक्षण वाणिज्य शाखेत पदवी व पदव्युत्तर असुन जीडीसीए व सेबी द्वारे प्रमाणित रिसर्च ॲनालिस्ट असे झाले असुन कोलाड पंचक्रोशीत त्यांनी प्रथम सीए बनन्याचा बहुमान मिळवला आहे .याबाबत चिंचवली गावकर्यांमध्ये व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असुन शाळकरी व महाविद्यालयीन मुलांसमोर रोशन येरुणकरांनी आदर्श निर्माण केला आहे. कोलाड विभाग काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इंजिनीअर हरिओम भाऊ टाळकुटे यांनी रोशन येरूणकर यांना शुभेच्छा दिल्या असून कोलाड पंचक्रोशीसाठी ही आनंदाची ,कौतुकाची व युवकांसाठी प्रेरणेची बाब आहे .सी ए ची परीक्षा ही अत्यंत कठीण असुन त्यात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी आहे.सीए येरुणकर यांनी पंचक्रोशीत आदर्श निर्माण केला आहे.यावेळी सीए रोशन येरुणकर यांनी सांगितले की ही परिक्षा अर्थातच ज्ञानाच्या कठोर चाचणीची परिक्षा घेणारी ठरते परंतु शिस्त व अभ्यासात सातत्य असल्यावर व आकलनक्षमता विकसित केल्यावर यश हमखास मिळते असे सीए रोशन येरुणकर यांनी सांगितले तसेच पंचक्रोशीतील ज्या विद्यार्थ्यांना सीए परिक्षेसाठी तयारी करायचीय त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असेन असे ते बोलायला विसरले नाहीत.तसेच यशाचे श्रेय आई ,वडील ,पत्नी ,मित्र मंडळी व त्यांच्यावर विश्वास ठेवलेल्या प्रत्येकाला त्यांनी दिले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये