आपला जिल्हामहाराष्ट्र

राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

महाड (मिलिंद माने)
रायगड किल्ल्याच्या जवळच असलेल्या कोंझर गावातील राजमाता जिजामाता विद्यालयाच्या राजमाता जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने बसवला आहे. या पुतळ्याचे अनावरण शनिवार दिनांक 22 जून रोजी करण्यात आले. यावेळी १९९८ ते २००० च्या बॅचमधील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, उपस्थित होते.

Download Aadvaith Global APP

कोंझर गावामध्ये रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे जिजामाता माध्यमिक विद्यालय अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या विद्यालयाच्या १९९८ ते २००० या कालावधीमधील माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या दर्शनी भागावर राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या विद्यार्थ्यांनी स्व रकमेतून उभा केला. या पुतळ्याचे अनावरण शनिवार दिनांक २२ जून रोजी करण्यात आले.

या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तसेच महाड तालुक्याचे माजी सभापती संजय चिखले यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्कूल कमिटी चेअरमन लक्ष्मण पवार तसेच संस्थेचे खजिनदार संजय चिखले, कोंझर गावाचे सरपंच विजय कदम, मनोहर कदम, मुख्याध्यापक दिघे सर, माजी मुख्याध्यापक माधव कुलकर्णी सर, माजी विद्यार्थी प्रतिनिधी गिरीश मगर, निलेश गायकवाड, इम्रान सय्यद, राजू हिरवे, मंगेश पवार, सचिन लामजे, गितेश पाटील, सतीश देवगडकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
विधिवत पूजा केल्यानंतर पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब साहेबांचा एकच जय जय कार केला. यावेळी संजय चिखले यांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यात माजी विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला. यामुळे शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळणार आहे असे प्रतिपादन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये