आरोग्य व शिक्षण

दहावी परीक्षेत विद्यामंदिर पोलादपूर चा निकाल ९४.१७ टक्के, विद्यामंदिर पोलादपूरचा प्रणव धायगुडे विद्यालयातून प्रथम तर तालुक्यातून व्दितीय

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ, यांचे मार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल २७ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून या परीक्षेमध्ये विद्यामंदिर पोलादपूरचा निकाल ९४.१७ टक्के लागला आहे. विद्यामंदिर पोलादपूर मधून १०३ विद्यार्थी दहावी परीक्षेस पात्र ठरले होते या पैकी ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Download Aadvaith Global APP

तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर शाळेतील १७ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, ३५ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी गुण, ३७ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी गुण मिळाले आहेत.
विद्यामंदिर पोलादपूर चे मुख्याध्यापक साळुंखे सर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यामंदिर पोलादपूरचा प्रणव गुलाब धायगुडे या विद्यार्थ्याला ९३.२० टक्के गुण मिळाले असून विद्यालयातून प्रथम तर तालुक्यातून द्वितीय येण्याचा बहुमान मिळाला आहे. प्राची पांडुरंग झोरे (९१.४०%) विद्यालयातून व्दितीय, साई सुनीत मते (८८%) विद्यालयातून तृतीय, सलोनी निलेश पवार(८७.६०%) विद्यालयातून चतुर्थ, कार्तिकी विजय साळवी(८७.४०%) गुणांसहित विद्यालयातून पाचवा क्रमांक पटकावला आहे. दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये