आरोग्य व शिक्षण

दहावी परीक्षेचा पोलादपूर तालुक्याचा निकाल ९६.९४ टक्केतालुक्यातून ; यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूलचा मृदुल घाटे प्रथम

जिल्ह्याचा निकाल ९६.७५ टक्के

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ, यांचे मार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल २७ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून या परीक्षेमध्ये पोलादपूर तालुक्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. दहावी परीक्षेस ४३४ विद्यार्थी पैकी ४२६ विद्यार्थी पात्र ठरले होते या पैकी ४१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Download Aadvaith Global APP

तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर शाळेचा निकाल ९४.१७%, रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री वरदायनी माध्यमिक व विद्यालय चा निकाल ९८.६३%, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय देवळे चा निकाल १००%, कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे निकाल १००%, माध्यमिक विद्यालय साखर चा निकाल ९०.९०%, न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे चा निकाल ९५.८३%, न्यू इंग्लिश स्कूल पैठण चा निकाल ५०%, हाजी अली आदम अनावरे हायस्कूल पोलादपूर चा निकाल १००%, माध्यमिक विद्यालय सवाद चा निकाल १००%, न्यू इंग्लिश स्कूल पळचिल चा निकाल १००%, माऊली प्रशाळा कोतवाल चा निकाल १००%, श्रीराम विद्यालय लोहारे चा निकाल १००%, तानाजी शेलारमामा प्रशाळा १००%, न्यू इंग्लिश स्कूल ओंबळी चा निकाल १००%, माध्यमिक विद्यालय गोळेगणी चा निकाल ७८.५७%, यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल चा निकाल १००%, श्री शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मिडीयम स्कूल चा निकाल १००%, सहयोग प्रतिष्ठान साने गुरुजी माध्यमिक विद्यालय चा निकाल १००% लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल पोलादपूर चा मृदुल अमित घाटे हा ९५.२०% गुण मिळवीत तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे. विद्यामंदिर पोलादपूरचा प्रणय गुलाब धायगुडे या विद्यार्थ्याला ९३.२०% गुण मिळाले असून तालुक्यातून द्वितीय येण्याचा बहुमान मिळाला आहे. दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये