महाराष्ट्र

वाकण येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा
     पोलादपूर तालुक्यातील वाकण येथे भिमक्रांती मंडळ वाकण यांच्या विद्यमाने प्रतिवर्षी प्रमाणे तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ध्वजारोहण, धम्म पूजापाठ, भव्य मिरवणूक,मान्यवरांचा सत्कार आदी कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाप्रसंगी प्रवचनकार दयानंद बगाडे गुरुजी, ग्रुप ग्रामपंचायत वाकण सरपंच शांताराम जंगम, उपसरपंच नारायण सकपाळ, सदस्य रेश्मा लक्ष्मण पवार, सदस्य रामचंद्र साने, संतोष सखाराम सकपाळ(कोविड योद्धा,समता सैनिक दल जवान) यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
        कार्यक्रमाला बौद्धजन सेवा संघ अध्यक्ष आर एस जाधव, अनिल बी. मोरे(मा.अध्यक्ष, दक्षिण रायगड भा. बौ. महासभा), बौ. से. संघ सचिव संजय खैरे, संघटक सिद्धार्थ शिर्के,डॉ. गुलाबराव सोनावणे,  संदिप जाबडे(पत्रकार, नवभारत), ग्रामसेविका त्रिशिला गंभीरे, तालुकाध्यक्ष संतोष मोरे, सचिव सचिन साळवी,रोशन सकपाळ(पोलिस पाटील), नारायण साने, विठोबा साने, भरत जाधव, प्रकाश जाधव,साने मॅडम(पोलिस पाटील), निलकंठ साने(पत्रकार), मिलिंद जाधव,नितेश सकपाळ, दिपक साळवी यांसह पोलादपूर तालुक्यातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली.
     यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आर एस जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजातील बांधवांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवत एकत्र येणं अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अनिल मोरे यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक गावाला त्या त्या व्यक्तीच्या कार्याने ओळखले जाते, त्यामुळे त्या व्यक्तीचा नामउल्लेख या प्रसंगी करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. भारतीय राज्यघटना हा भारत देशाचा आत्मा असून यावर जर कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर गाठ आमच्याशी असल्याचे सिद्धार्थ शिर्के यांनी आपल्या मनोगतात सांगितले. भारतीय संविधान रक्षणासाठी आपण एकत्र येणे गरजेचे असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले. पत्रकार संदिप जाबडे यांनी वाकण येथील संतोष सकपाळ या भूमीपुत्राने कोरोनाच्या जागतिक महामारीत केलेल्या कामाचे कौतुक केले. सोनू जाधव सारखा ग्रामीण भागातील गायक महाराष्ट्रात नावलौकिक करत असल्याचे आवर्जून उल्लेख करीत, ही पोलादपूर तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले. रात्री गायक सोनू जाधव व गायिका आशा धांदे यांचा भीम गीतांचा जंगी सामना पाहण्यासाठी तालुक्यासह जिह्यातील प्रेक्षकांनी एकच गर्दी केली. कार्यक्रमास राहुल मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सभाध्यक्ष, अनिल जाधव, स्वागताध्यक्ष प्रकाश मोरे, सुंदर मोरे, वामन मोरे, सुनिल मोरे यांनी तर सूत्रसंचालन सोनू जाधव, मोतीराम सकपाळ, सुशांत मोरे, विकास पवार, रत्नदीप मोरे, नथुराम पवार यांनी केले.

Download Aadvaith Global APP
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये