महाराष्ट्र

मंजुळा जाधव यांचा आज प्रथम स्मृतिदिनी; प्रथम स्मृतिदिनी सुसंस्कृत महिलेच्या आठवणींना उजाळा

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

मंजुळा जाधव यांचा प्रथम स्मृतिदिन ; आठवणींना उजाळा

Download Aadvaith Global APP

पोलादपूर तालुक्यातील हळदुले गावचे मूळ रहिवासी दिवंगत सहदेव विठ्ठल जाधव यांच्या पत्नी दिवंगत मंजुळा सहदेव जाधव यांचे २२ मे २०२३ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी हळदुले या गावी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली व नातोंडे असा परिवार आहे.

मंजुळा जाधव यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात १९४१ साली मुंबईतील मालाड येथे झाला. सामाजिक कार्यात अग्रेसर व मंत्रालयात कार्यरत असणाऱ्या सहदेव विठ्ठल जाधव यांच्यासोबत त्या विवाहबद्ध झाल्या. विवाहानंतर या दाम्पत्याला अरुण,अनिल, उर्मिला व मृणालिनी अशी चार आपत्ये झाली. दोघेही सुशिक्षित असल्याने सर्वच पाल्यांना उच्च शिक्षण दिले. १९९६ साली सहदेव जाधव हे सरकारी सेवेतून निवृत्त झाले तर १९९८ साली सहदेव विठ्ठल जाधव यांचे आकस्मित निधन झाले. पतीच्या जाण्यानंतर देखील खचून न जाता आपल्या मुलांसाठी आईची तर नातोंडासाठी आजीची भूमिका चोखपणे बजावली. मंजुळा जाधव यांना वाचनाची विशेष आवड होती. वृत्तपत्रे,कथा, कादंबऱ्या त्या आवडीने वाचत. कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर आपल्या मुलासह आपल्या मूळ गावी हळदुले गावी वास्तव्यास आल्या. सुसज्ज नवीन घर बांधले, सर्व काही सुरळीत होते. अचानक २२ मे २०२३ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी आपल्या राहत्या घरात दिवंगत मंजुळा जाधव यांनी शेवटचा श्वास घेतला आणि अनंतात विलीन झाल्या. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच पोलादपूर तालुक्यातून बहुजन समाज त्यांच्या अंत्ययात्रेसाठी दाखल झाला. दिवंगत मंजुळा जाधव या सुसंस्कृत आदर्श मातेला बौद्धजन सेवा संघ पोलादपूर व तालुक्यातील बौध्द समाजाकडून प्रथम स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली. दि. मंजुळा जाधव प्रथम स्मृतिदिन २२ मे २०२४ रोजी हळदुले, ता. पोलादपूर येथे होणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये