महाराष्ट्र

दाभिळ येथे श्रीसंत मोरे माऊली यांच्या शिष्यगणांनी केला कुलदैवत प्राणप्रतिष्ठा, वास्तूशांती सोहळा संपन्न

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

पोलादपूर तालुक्यातील दाभिळ गावी कोकणचे पारमार्थिक भाग्यविधाते श्रीसंत मोरे माऊली यांच्या शिष्यगणांनी केला कुलदैवत प्राणप्रतिष्ठा व वास्तू शांती सोहळा मोठया थाटा माटात केला साजरा
कोकणचे पारमार्थिक भाग्यविधाते श्रीसंत मोरे माऊली यांच्या कृपाआशीर्वादाने व श्रीसंत मोरे माऊली संप्रदायाचे अधिस्तानाधिपती सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली मार्गदर्शनाखाली कुलदेवतेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व वास्तू शांती याचं नियोजन करण्यात आले होते वास्तू शांती निमित्ताने श्रीसंत मोरे माऊली संप्रदातील महिला किर्तनकार सौ.दर्शनाताई भिलारे यांची किर्तनसेवा पार पडली.तसेच श्री कुलदैवत मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांची किर्तनसेवा पार पडली या कीर्तनातून त्यांनी आपल्या आजोबांनी म्हणजे मारुती बाबा यांनी या गावात पहिला टाळ वाजवून परमार्थाचे रोपटे लावले आणि त्याचा वेळू गगनाला गेला अश्या आठवणींना उजाळा देऊन कीर्तनातून आंतीरीची घेतो जोडी पाहे जोडी भावाची या अभंगावर किर्तनकरून सर्वांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य व मृदुंगाचार्य यांनी साथ केली या कार्यक्रमाला सर्व महिलांसाठी हळदी कुंकूचे नियोजन केले होते. सर्व तरुणांनी सहभागी होऊन मोठ्या उत्साहात साजरा केला सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रामस्थ मंडळ दाभिळ यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवताचार्य कृष्णा महाराज मोरे यांनी केले व्हिडिओ जनरलीस अंकुश महाराज कुमठेकर

Download Aadvaith Global APP
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये