राजकीय

मुरुड जंजिरा किल्ला सुशोभीकरण, मच्छीमार बांधवांसाठी अद्यावत सुख सुविधांसाठी प्रयत्न करणार : सुनिल तटकरे

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

रायगड : कोकणात लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील प्रचार जोराने सुरू आहे.  पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यावर हा परिसर बदलणार आहे. या बदलणार्‍या प्रवाहाबरोबर स्थानिक माणूस ठळकपणे दिसला पाहिजे. अनेक प्रकल्प येतात. उद्याच्या भविष्यात जे जे प्रकल्प येतील त्यामध्ये शंभर टक्के इथला भूमीपुत्र राहिल याची खबरदारी घेणार आहोत, असा विश्वास महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे ग्रामस्थांना दिला.

Download Aadvaith Global APP

रायगड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अलिबाग – मुरुड विधानसभा मतदारसंघातील मुरुड तालुक्यातील राजपुरी पंचायत समिती गणाची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी तटकरे बोलत होते.  यावेळी आमदार महेंद्र दळवी, भाजप नेते महेश मोहिते,आदींसह महायुतीचे  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

तटकरे म्हणाले, परंपरागत… शेकडो वर्षे मच्छीमार बांधव मच्छीमारीचा व्यवसाय करत आले, त्यांच्याबद्दल कोणतीही चुकीची पद्धत खपवून घेतली जाणार नाही. माझ्या मच्छीमार बांधवांचा व्यवसाय सुरक्षित राहण्यासाठी जे काही करायचे असेल ते सर्व काम महायुती म्हणून सामुदायिक करणार आहोत. ती आमची बांधिलकी असणार आहे. पर्यटनावर आधारित रोजगार वाढेल. अद्यावत जेट्टी आपण एवढ्याचसाठी करत आहोत की याठिकाणी मुरुडचा ऐतिहासिक जंजिरा किल्ला बघण्यासाठी शिवप्रेमी, पर्यटक येतील. अशावेळी पायाभूत सुविधा करण्यासाठी पावले उचलत आहोत. मच्छीमार बांधवांवर अन्याय होत असेल, नुकसान भरपाई देण्याबाबत काही कमतरता रहात असेल तर ती भरुन काढण्यासाठी पुढच्या कालावधीत शंभर टक्के काम करणार आहोत, असे तटकरे यांनी सांगितले.

एक हजार कोटीची जेट्टीची कामे महायुतीच्या माध्यमातून सुरू आहेत. यामध्ये अद्ययावत पद्धतीची जेट्टी मिळणार आहे. मच्छीमारी व्यवसाय सुरक्षित राहील. राज्यसरकारच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज उभे केले जातील. सरकारला एक हजार कोटी रुपयांचे परकीय चलन या काबाडकष्ट करणार्‍या माझ्या मच्छीमार बांधवांमुळे मिळते. मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधा देण्याचे काम सागरमाला योजनेतंर्गत नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून होत आहे. पंतप्रधान मत्स्य योजना यापूर्वी कधी आणली गेली नाही अशी योजना देशाच्या पंतप्रधानांनी आणली आहे. या योजनेमध्ये अनेक व्यक्तिगत लाभार्थ्यांना, अनेक जेट्टींना थेटपणे अनुदान देण्याच्या योजना आहेत. हा सुनिल तटकरे तुमचा सेवक म्हणून या योजना राजपुरीच्या गणात आणण्यासाठी वचनबद्ध आहे, असा शब्दही तटकरे यांनी दिला.‎

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये