राजकीय

काँग्रेसच्या काळात संविधान दीन कधीच साजरा केला नाही, संविधान दीन साजरा करण्याचा निर्णय मोदी सरकारचा : सुनिल तटकरे

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

रायगड : राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील मतदार संघात सर्वपक्षीयांचा प्रचाराचा जोर वाढला आहे. कोकणातही महायुती प्रभावीपणे आपली प्रचार यंत्रणा राबावत असल्याचे दिसते.  यंदाची लोकसभेची निवडणूक म्हणजे  केवळ सुनिल तटकरे विरुद्ध अनंत गीते एवढी सिमीत नाही ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे. संविधान दिन ज्यांनी साजरा करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या हेतूवरच संशय घेण्याचे पाप काही विघ्नसंतोषी लोक करत आहेत. धर्माधर्मात आणि जातीजातीमधील वातावरण बिघडवण्याचे काम अनंत गीते यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केला.

Download Aadvaith Global APP

रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ  पेण येथे महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी तटकरे बोलत होते. या जाहीर सभेला आमदार रविंद्र पाटील, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आदींसह महायुतीतील  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले,  संविधान आणि अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत देशाच्या एकात्मतेला तडा देण्याचा प्रयत्न तथाकथित इंडिया आघाडीच्या माध्यमातून केला जातो आहे. देशाची नेत्रदीपक प्रगती पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत आणि राज्याचा वेग मुख्यमंत्री  एकनाथ संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवत आहेत. अशावेळी बहुजनांच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये असले पाहिजे हा विचार करत आम्ही महायुतीमध्ये एनडीएमध्ये सहभागी झालो असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील दोन टप्प्यात ज्या निवडणूका झाल्या आहेत त्यात शंभर टक्के जागा महायुतीच्या पदरात पडणारच असल्याचं ठाम विश्वास व्यक्त करताना तटकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी तळागाळातील लोकांच्या मनात रुजवलेले प्रेम आहे. थेटपणाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ६ हजार रुपये भारत सरकारचे आणि ६ हजार रुपये राज्यसरकारचे असे १२ हजार रुपये जमा होत आहेत. व्यक्तिगत महिला लाभार्थ्यांसाठी नमो नारी अभियान सुरू आहे. महिलांना ५० लाख रुपयांचे कर्ज घेताना ३५ टक्के सबसिडी दिली आहे.  ग्रामीण भागात काबाडकष्ट करणार्‍या शेतकऱ्यांच्या घराघरामध्ये नळाद्वारे पाणी योजना नेली असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला. आज प्रगतीपथावर विकासकामे होताना दिसत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये