महाराष्ट्र

दुबईत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचे औचित्य साधून शिवाजी काका ग्रुप तर्फे दुबईमध्ये भव्य दिव्य, लेझीमच्या गजरात जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. २१ एप्रिल २०२४ रोजी हा सोहळा  ग्लॅण्डले इंटरनॅशनल स्कूल दुबई येथे संपन्न झाला.  या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी चंद्रशेखर जाधव, अभिजीत देशमुख, प्रवीण वराडकर, डॉक्टर अनिल बनकर, रत्नाकर दंडवते, उदय मोरे, रमा काळे,सुलोचना मुंगे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूचना नाईक, साक्षी मोरे व शिवाजी काका ग्रुपचे अध्यक्ष शिवाजी काका नरूणे यांनी केले. सागर जाधव(एस जे) यांचा डिजे, श्रीमंत ढोल ताशा पथक यूएई चे वादन कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन नव्या पिढीसमोर दाखविण्यात आले. भारत मातेच्या विर पुरुषांच्या गाथा, त्यांची महती सादर करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये रत्नाकर दंडवते,डॉ. अनिल बनकर,उदय मोरे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती अभ्यासपूर्वक सगळ्यांसमोर मांडली. कार्यक्रमांमध्ये  विविध नृत्य,आंबेडकरांवरील गीते, पोवाडा सादर करण्यात आला. दुबईतील तमाम मराठी बांधवांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या प्रसंगी महिलांना गोल्डन ग्लोरी टेकनिकल कंपनी तर्फे लॉन्ग सर्विस अवॉर्ड प्रदान करून त्यांना गौरवण्यात आले.

Download Aadvaith Global APP
    शिवाजी काका ग्रुपमध्ये दुबई सारख्या ठिकाणी घरकामे करून आपला संसाराला हातभार लावणारा महिलांचा सहभाग आहे. आपल्या कामातून वेळात वेळ काढून हा कार्यक्रम सर्व महिलांनी मिळून सादर केला आणि समाजाला दाखवून दिले की आम्हीही आपल्या समाजातील एक अविभाज्य घटक आहोत.
वरील कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक, शिवाजी नरूणे,साक्षी मोरे,सूचना नाईक,विठोबा अहिरे व सहकारी चंद्रशेखर जाधव,संतोष भस्मे,मिलिंद मानके,किशोर मुंडे व इतर सर्व सहकार्यांनी अथक मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये