महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना आमच्या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही : सुनिल तटकरे

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

रायगड : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी कोकणात जोरात सुरू आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे.  अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने भाजप सोबत जाऊन विचारधारा सोडली अशी टीका केली जात आहे. यावर सडेतोड उत्तर देताना सुनील तटकरे यांनी या टीकेला सडेतोड उत्तर दिले असून उध्दव ठाकरे यांनी कॉंग्रेससोबत केलेली युती चालते मात्र आम्ही भाजपसोबत गेल्यावर आमच्यावर टीका केली जाते. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्या उध्दव ठाकरेंना आमच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. असे तटकरे यांनी खडसावले.

Download Aadvaith Global APP

दापोली – मंडणगड विधानसभा मतदारसंघात  चार जिल्हा परिषद गटात काल मोठ्या उत्साहात प्रचार सभा पार पडल्या. हर्णे जिल्हा परिषद गटातील पाजपंढरी येथे झालेल्या सभेत तटकरे बोलत होते.  या प्रचार सभेला आमदार योगेश कदम, माजी आमदार सुर्यकांत दळवी, माजी आमदार अशोक पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, जयंत साळगावकर, प्रितम उके, मुजीब रुमाणे, साधना बोथरे, आदींसह महायुतीचे  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

देशाच्या भवितव्याची जडणघडण करण्याच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वपूर्ण निवडणूक असून माझ्या पाठीशी मतदानरुपी ताकद उभी करावी, असे आवाहन उपस्थितांना केले. मागील निवडणुकीत या मतदारसंघात पिछाडीवर होतो मात्र यावेळी या मतदारसंघात श्रीवर्धन मतदारसंघापेक्षा सरस मताधिक्य माझ्या पारड्यात येईल, असा विश्वासही तटकरे व्यक्त केला.

आमदार योगेश कदम म्हणाले,  मुंबईतील ससून डॉक हे महत्त्वाचे केंद्र मानले जात होते त्याप्रमाणे हर्णे आणि पाजपंढरी बंदरात डॉक उभे केले जातील, असा शब्द दिला. २०५ कोटी रुपये हर्णे बंदराला मंजूर करुन घेतले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक हर्णे बंदरातून होणार आहे. भविष्याचा विचार करून या बंदरासाठी निधी मिळवला आहे. या भागात मरीन पार्क आणि फूड पार्क करण्याचा संकल्प केला आहे आणि १८० शासकीय जागांपैकी १६० एकरात हे पार्क उभे करणार आहे. शिवाय मच्छीमारीच्या दृष्टीने उद्योग उभे करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कदम यांनी दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये